शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

‘एकलव्य’ देणार निराश्रीतांना आधार

By admin | Updated: September 17, 2016 02:06 IST

अनुसुचीत जातीतील (एससी) निराश्रीतांना ‘रमाई आवास योजने’तून लाभ मिळत असतानाच आता अनुसुचीत जमातीतील

कपिल केकत  गोंदियाअनुसुचीत जातीतील (एससी) निराश्रीतांना ‘रमाई आवास योजने’तून लाभ मिळत असतानाच आता अनुसुचीत जमातीतील (एसटी) निराश्रीतांना आधार देण्यासाठी ‘एकलव्य घरकूल योजना’ येत असल्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कडून राबविण्यात येत असलेल्या एकलव्य घरकूल योजनेंतर्गत नगर परिषदेकडून लाभार्थ्यांची यादी मागविण्यात आल्याची माहिती आहे. यातून ही योजना शहरात येणार असल्याचे म्हणता येईल व असे झाल्यास अनुसुचित जमातीतील निराश्रीतांना यामुळे आधार मिळणार यात शंका नाही. आजघडीला शहरात ‘रमाई आवास योजना’ राबविली जात असून याचा फक्त अनुसुचित जातीतील (एससी) गरजूंनाच लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत नगर परिषदेने यावर्षी ६६ लाभार्थ्यांना लाभ ही दिला आहे. अनुसुचित जातीतील दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील दोन्ही गटातील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र फक्त अनुसुचीत जातीतील नागरिकांसाठीच ही योजना असल्याने अनुसुचीत जमातीतील गरजू यापासून दूर राहतात. परिणामी गरज असतानाही त्यांना लाभा पासून वंचीत रहावे लागत असून त्यांचा हिरमोड होतो. क्वचीत हीच बाब हेरून महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कडून नगर परिषदेला काही दिवसांपूर्वी अनुसुचीत जमातीतील (एसटी) नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘एकलव्य आदिवासी घरकूल योजने’बाबत पत्र पाठविण्यात आले. या पत्रातून नगर परिषदेला अनु.जमातीतील लाभार्थ्यांची यादी मागविण्यात आली होती. त्यानुसार नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी म्हाडाचे मुख्य अधिकारी यांच्याकडे शहरातील लाभार्थ्यांची यादी पाठविली आहे. विशेष म्हणजे, म्हाडाकडून पहिल्यांदाच नगर परिषदेला यादी पाठविण्याबाबत पत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे. यावरून म्हाडा शहरात ‘एकलव्य आदिवासी घरकूल योजना’ राबविण्याच्या तयारीत असल्याचे किंवा भविष्यात या योजनेवर काम करण्यास इच्छूक असल्याचे म्हणता येईल. असे झाल्यास शहराचा चेहरामोहरा तर बदलणार असून अनु.जमातीतील निराश्रीतांना मात्र ही योजना त्यांचे हक्काचे घरकूल मिळवून देणारी ठरणार आहे.११ लाभार्थ्यांची यादी पाठविलीमहाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कडून आलेल्या पत्राच्या आधारे नगर परिषदेने म्हाडाचे मुख्य अधिकारी यांच्याकडे शहरातील ११ लाभार्थ्याची यादी पाठविली आहे. नगर परिषदेकडे या योजनेंतर्गत १२ अर्ज आले होते व त्यातील ११ अर्ज पाठविण्यात आल्याचे कळले. शहरात भविष्यात या योजनेवर म्हाडा काम करण्यास तयार झाल्यास या लोकांना त्यांचे घरकूल मिळणार असे म्हणता येईल. २.५० लाखांचे अनुदान रमाई घरकूल योजनेंतर्गत अनु. जातीतील बीपीएल लाभार्थीला १.५० लाखांचे अनुदान दिले जाते. तर एपीएल लाभार्थीला १.३५ लाखांचे अनुदान दिले जाते. मात्र एकलव्य घरकूल योजनेंतर्गत लाभार्थीला २.५० लाखांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे म्हाडाची ही योजना अत्यंत लाभाची ठरणार आहे. २.५० लाखांचे अनुदान मिळाल्यास स्वत:चे घरकूल तयार करणे लाभार्थीला सहज शक्य होणार आहे.