शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिने लोटूनही कामाला सुरूवात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:50 IST

तिरोडा शहरापासून अडीच किमी. अंतरावर असलेल्या ग्राम गराडा (काशिघाट तीर्थक्षेत्र) येथे २५ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कोल्हापूरी बंधाºयाचे काम ....

ठळक मुद्देगराडा येथील कोल्हापुरी बंधारा : पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले होते भूमिपूजन

हुपराज जमईवार।लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा शहरापासून अडीच किमी. अंतरावर असलेल्या ग्राम गराडा (काशिघाट तीर्थक्षेत्र) येथे २५ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कोल्हापूरी बंधाºयाचे काम आठ महिने लोटूनही सुरू झालेले नाही. परिसरासाठी वरदान ठरणाºया बंधाºयाचे काम अडकून पडले असल्याने जलसंधारण विभाग किती तत्परतेने कार्य करीत आहे याची प्रचिती येते.महाराष्ट्र शासनाने जलसंधारण विभागामार्फत या कोल्हापूरी बंधाºयासाठी ३० आॅगस्ट २०११ रोजी ६१.८९ लाख रूपयांची प्रशासकीय मंजूरी दिली आहे. त्यानंतर सन २०१७ मध्ये पलाकमंत्र्यांच्या हस्ते बंधाºयाचे भूमिपूजन झाले. मात्र असे असतानाही अद्याप या बंधाºयाचे काम काही सुरू झाले नाही. सात वर्षांपूर्वी मंजूरी मिळूनही विभागाचे दुर्लक्ष या बंधाºयाला भोवले असेच म्हणावे लागत आहे.या योजनेचे एकूण पाणलोट क्षेत्र ५२.९८ चौ.मैल असून मुक्त पाणलोट क्षेत्र २२.८३ चौ.मैल आहे. या बंधाºयाची लांबी ४१.२ मीटर असून ५ दारांनी पाणी अडविण्यात येणार आहे. लघु सिंचन (जलसंधारण) विभागाकडे या कामाची जबाबदारी असून सदर विभाग आजही झोपेतच आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते सुनील बारापात्री व गराडा येथील नागरिकांनी केली आहे.६० हेक्टर क्षेत्राला लाभया बंधाºयाचे काम झाल्यास गराडा येथील ६० हेक्टर शेतीला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार असून जमिनीतील भुजळ पातळी व अप्रत्यक्ष सिचंनाचाही लाभ होणार आहे. शिवाय काशिघाट क्षेत्रातील भाविकांना विविध धार्मिक कार्यांकरिता पाण्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार असून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.