शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी प्रयत्न- पटोले

By admin | Updated: January 13, 2015 23:01 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची गती भाजप सरकारच्या काळात कुठेही मंदावणार नाही, असे सांगत गोंदिया जिल्ह्यात तेल शुद्धीकरण प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची

गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची गती भाजप सरकारच्या काळात कुठेही मंदावणार नाही, असे सांगत गोंदिया जिल्ह्यात तेल शुद्धीकरण प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती खा.नाना पटोले यांनी येथे दिली.जिल्ह्याच्या विविध विकासात्मक मुद्द्यांवर पत्रकारांना माहिती देताना खा.पटोले यांनी सांगितले की, पेट्रो केमिकल रिफायनरी (तेल शुद्धीकरण प्रकल्प) आतापर्यंत मध्यप्रदेशातील बिना सोडल्यास केवळ समुद्रतटावरच आहेत. मात्र युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षात्मकदृष्ट्या देशाच्या मध्यवर्ती भागात हा प्रकल्प असणे गरजेचे आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात रेल्वेमार्ग, राष्ट्रीय महामार्गादरम्यान हा प्रकल्प उभारल्यास तो सर्व दृष्टींनी सुरक्षित राहील, असे आपण केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांना पटवून दिले असल्याचे खा.पटोले म्हणाले.क्रुड आॅईलपासून सर्व प्रकारचे पेट्रोल, डिझेल, रॉकेल, गॅस, डांबर यासारख्या १४ वस्तू तयार केल्या जातात. त्यासाठी रेल्वे आणि महामार्गापासून जवळ असलेली एक हजार एकर जागा घ्यावी लागणार आहे. गोंदिया-बालाघाट मार्ग किंवा गोंदिया कोहमारा मार्गावरील जागा त्यासाठी डोळ्यासमोर असल्याचेही खा.पटोले म्हणाले.गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळत नसल्यामुळे आपण समाधानी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी संसदेत विविध पक्षांच्या ७० खासदारांचा दबावगट बनविण्यात आला असून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पटोले म्हणाले. गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील काही तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळले. त्यामुळे निधीवर परिणाम होईल. मात्र काही तालुके पुन्हा नक्षलग्रस्त यादीत जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)