शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:34 IST

गोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देऊन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, ...

गोंदिया : केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देऊन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जे. एम. अभ्यंकर यांनी दिले.

अल्पसंख्याक संस्थांचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर चर्चा, निराकरण व उपाययोजनेबाबत गुरुवारी (दि. १२) शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिल चव्हाण, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रदीप समरीत, नागपूर येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहायक संचालक सतीश मेंढे उपस्थित होते. अभ्यंकर म्हणाले, अल्पसंख्याक समाज जास्तीत जास्त शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी शिक्षण विभागाने अविरत प्रयत्न करावे. अल्पसंख्याक कमिशनतर्फे शाळेच्या संस्थांचे समस्यांचे निराकरण आवश्य करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जे. एम. अभ्यंकर यांनी गोंदिया येथील विवेक मंदिर शाळेमध्ये भेट देऊन अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन केले. भावेश चौधरी, वीरेंद्र बिसेन व रोशन करंजेकर यांनी तयार केलेले प्रोजेक्ट टेम्परेचर अँड ह्युमिडिटी, अल्ट्रासोनिक रेंज फिंडर, स्मार्ट डस्टबीन, थ्रीडी प्रिंटर सिस्टीम, वॉटर

क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम, वे मेझरमेंट, कार्बनडाय ऑक्साईड मॉनिटरिंग सिस्टीम प्रोजेक्‍टचे निरीक्षण करून संशोधनात्मक वृत्तीचे कौतुक केले. यावेळी विवेक मंदिर शाळेचे संस्थाचालक दिलीप जैन, पालीवाल, चव्हाण, दीपम पटेल, प्राचार्य नीता कारवट, अशोक कारटा व अप्पर तहसीलदार अनिल खडतकर उपस्थित होते.