शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्यांची शाळा तपासणी मोहीम

By admin | Updated: August 21, 2014 23:57 IST

शालेय प्रशासनात पारदर्शकता यावी, शैक्षणिक कार्यात सुधारणा व्हावी, शिक्षकांच्या कार्यात नियमितता असावी, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्ज्यात सुधारणा व्हावी या उद्देशातून तिरोड्याच्या गट

काचेवानी : शालेय प्रशासनात पारदर्शकता यावी, शैक्षणिक कार्यात सुधारणा व्हावी, शिक्षकांच्या कार्यात नियमितता असावी, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्ज्यात सुधारणा व्हावी या उद्देशातून तिरोड्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या सहयोगी ताफ्यासह शाळांना अचानक भेटी देण्याची मोहीम सुरू केली आहे. आजपर्यंत अनेक शाळांना भेटी देवून तपासणी करण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. तालुक्याच्या करटी केंद्रांतर्गत बेरडीपार शाळेत गटशिक्षणाधिकारी यांनी अचानक भेट दिली. गटशिक्षणाधिकारी सकाळी ९.३० वाजता शाळेत दाखल झाले. यानंतर दोन शिक्षण विस्तार अधिकारी, पाच विषयतज्ञ, एक गटसमन्वयक, एक केंद्रप्रमुख आणि अन्य एक शिक्षक उपस्थित झाले. मात्र १०.१५ वाजता शिक्षक उपस्थित झाले नसल्याने गटशिक्षणाधिकारी मांढरे यांनी शालेय मुलांची प्रार्थना घेतली. सर्वच शिक्षक १०.२० वाजतानंतर उपस्थित झाल्याने गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी शिक्षकांना फटकारले आणि उपस्थिती रजिस्टरमध्ये स्वाक्षऱ्या करू दिल्या नाही. मांढरे यांनी विषयतज्ज्ञ आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या माध्यमाने शाळेची तपासणी केली. तिसऱ्या व पाचव्या वर्गाची तपासणी विषयतज्ज्ञ ब्रजेश मिश्रा, सहाव्या वर्गाची तपासणी शिक्षण विस्तार अधिकारी डी.बी. साकुरे यांनी केली. पोषण आहार, शालेय रेकॉर्डची तपासणी शिक्षण विस्तार अधिकारी पी.पी. समरीत यांनी केली. गटशिक्षणाधिकाऱ्यांना तपासणी अहवाल दिल्यानंतर वर्गवार माहिती जाणून घेतली आणि ज्यात उणीवा दिसून आल्या त्यात तातडीने सुधारणा करण्यात यावे, असे बजावून सांगितले. शासन शिक्षणावर सर्वाधिक निधी खर्च करतो. शिक्षकांना भरपूर वेतन दिल्या जाते. त्यामुळे शिक्षकांनी आपली जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडून शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिला. प्रत्येक शिक्षकाची वेळ ठरवून दिलेली आहे. वेळेचे भान ठेवून शाळेत वेळेवर उपस्थित राहण्याचे सांगितले. कामात कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांना धारेवर धरण्यात येईल, असेही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बजावले. शाळा तपासणी मोहिमेत गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांच्याशिक्षण विस्तार अधिकारी पी.पी. समरीत, डी.बी. साकुरे, गटसमन्वयक खोब्रागडे, केंद्रप्रमुख आर.बी. दास, विषयतज्ज्ञ ब्रजेश मिश्रा, पी.एस. ठाकरे, एस.पी. कुंजरकर आणि पी.एस. लांडगे उपस्थित होते. (वार्ताहर)