शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

‘सेंद्रीय शेती’ देईल शेतकºयांना आर्थिक समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:42 IST

धान उत्पादक असलेल्या गोंदिया जिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन केलेल्या तांदळाला ३ हजार रूपये क्विंटल भाव आहे. परंतु याच जिल्ह्यात सेंद्रीय खतांच्या माध्यमातून पिकविलेल्या तांदळाला सरळ दुप्पट म्हणजे ६ हजार रूपये क्विंटल भाव देण्याची तयारी ग्राहकांची आहे.

ठळक मुद्दे६ हजार रूपये मिळेल दर : सेंद्रीय शेतमालाला ग्राहकांची पसंती

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान उत्पादक असलेल्या गोंदिया जिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर करून उत्पादन केलेल्या तांदळाला ३ हजार रूपये क्विंटल भाव आहे. परंतु याच जिल्ह्यात सेंद्रीय खतांच्या माध्यमातून पिकविलेल्या तांदळाला सरळ दुप्पट म्हणजे ६ हजार रूपये क्विंटल भाव देण्याची तयारी ग्राहकांची आहे. शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही अशी ओरड करण्यापेक्षा सेंद्रीय शेतीची कास धरून आपली आर्थिक समृध्दी गाठण्याची संधी मिळाली आहे. शेतकºयांना आर्थिक संपन्नतेसाठी सेंद्रीय शेतीकडे वळावे लागेल.अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी जमिनीची पोत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या माध्यमातून पिकविलेले अन्न सेवन केल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. रासायनिक खतातून पिकविलेल्या अन्नामुळे विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे. परंतु सेंद्रिय शेतीतून पिकविलेले अन्न आरोग्यासाठी लाभदायक असल्यामुळे सेंद्रीय खतातून पिकविलेल्या तांदळाकडे आता अनेकांचा कल वाढला आहे. त्यामुळे सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आर्थिक समृध्दीचा मार्ग गवसला आहे. शेतकऱ्यांच्या धानाला १५०० रूपये क्विंटल भाव आहे. त्या धानापासून शेतकऱ्यांनी भरडाई करून तांदूळ तयार केल्यास त्या तांदळाला बाजारात ३ हजार रूपये क्विंटल भाव मिळतो. परंतु सेंद्रीय शेतीतून पिकविलेल्या तांदळाला प्रती क्विंटल ६ हजार रूपये आहे.यंदा कमी पाऊस झाल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन झाले नाही. मात्र यानंतर ५०० क्विंटल सेंद्रीय तांदूळ विक्रीसाठी तयार करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने सेंद्रीय शेती संदर्भात केलेल्या जनजागृतीमुळे आता सेंद्रीय तांदळाची मागणी वाढली आहे.प्रकल्प संचालक आणि आत्मा गोंदिया अंतर्गत परंपरागत कृषि विकास योजना सेंद्रीय शेती सन २०१६-१७ मध्ये गोंदिया जिल्ह्यात २० शेतकरी गट स्थापन केले. या २० गटांमध्ये हजारो शेतकºयांचा समावेश आहे.सेंद्रीय पध्दतीने तांदळाचे उत्पादन घेत आहेत. या गटांना आत्मा अंतर्गत प्रशिक्षण, शेतकरी सहल, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सेंद्रीय कीटकनाशके, बुरशी नाशके, आणि सेंद्रीय खते यांचे युनिट उभारण्याकरीता साहित्य, उपकरणे, व प्रशिक्षण दिले जात आहे.५१ गटांमध्ये २५०० शेतकरीसेंद्रीय शेती करणारे शेतकºयांचे गट तयार करण्यात आले. आधीचे शेतकऱ्यांचे २० गट तयार करण्यात आले आहेत. सेंद्रीय शेतीवर भर देण्यासाठी पुन्हा जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांनी ३१ गट तयार करण्यास सांगितले. जिल्ह्यात सेंद्रीय शेती करणारे ५१ गटात आजघडीला २ हजार ५०० शेतकऱ्यांचा समावेश आहे.फसवणूक होणार नाही म्हणून सबळ यंत्रणासेंद्रीय शेतीतून पिकविलेल्या तांदूळाला रासायनिक खातातून पिकविलेल्या तांदळाच्या तुलनेत दुप्पट किंमत मिळत आहे. दोन्ही प्रकारचे तांदूळ समोरा-समोर ठेवले तर कोणते तांदूळ सेंद्रीय आहे हे ओळखता येत नाही. त्यामुळे सेंद्रीय शेतीच्या नावावर फसवणुक होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून सबळ यंत्रणा उभी केली.५० हजार एकरात होऊ शकते सेंद्रीय शेतीसेंद्रीय शेतीसाठी पशूधनाची मोठ्या प्रमाणात गरज असते.जिल्ह्यात सध्यास्थितीत २ लाख जनावरे असल्याने या जनावरांपासून मिळणाºया शेणापासून सेंद्रीय खत तयार होऊ शकतो. जिल्ह्यातील ५० हजार एकरवर सेंद्रीय शेती करू शकतो एवढे पशूधन उपलब्ध आहे.