शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: October 21, 2016 01:36 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा भंडारा विभाग हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील एकदम शेवटचा विभाग आहे.

भंडारा विभाग वाऱ्यावर : नियोजनशून्यतेमुळे वाढतोय तोटादेवरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा भंडारा विभाग हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील एकदम शेवटचा विभाग आहे. या विभागात ४०० पेक्षा जास्त बसेस आहेत. याद्वारे भंडारा व गोंदिया अशा दोन जिल्ह्यांमध्ये प्रवासी वाहतूक केली जाते. परंतु या विभागाकडे एसटी महामंडळाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. सध्या या विभागात अनेक पदे रिक्त असल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. या विभागात विभाग नियंत्रकाचे, विभागीय वाहतूक अधिकाऱ्याचे पद रिक्त असून सहा आगारांपैकी फक्त एकाच आगारात (तुमसर) नियमित आगार व्यवस्थापक आहे. उर्वरीत पाचही आगारात तात्पुरते आगार व्यवस्थापक कार्यरत आहेत. या विभागात सध्या यंत्र अभियंता चालन यांनाच विभाग नियंत्रकाचा कार्यभार आहे. परंतु असे असताना त्याच्याच कार्यकाळात वाहनांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. मार्ग बंद वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अपघाताचे प्रमाणसुध्दा वाढलेले आहे. तसेच मार्गस्थ बिघाडाचे प्रमाणही वाढलेले आहे. यावरून भंडारा विभागात वाहनांची देखभाल योग्य प्रकारे केली जात नसल्याचे सिध्द होते, अशी खंत देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी व्यक्त केली आहे. भंडारा विभागात वाहकांच्या देखरेखीसाठी किंवा अपहार टाळण्याच्या दृष्टीने जे तपासणी पथक आहे त्यांना देण्यात आलेल्या गाड्या अर्ध्यापेक्षा जास्त नादुरूस्त असून विभागीय कार्यशाळेतच पडून आहेत. ज्या गाड्या मार्गावर आहेत त्या गाड्या तात्पुरत्या दुरूस्त आहेत. त्यामुळे तपासणी पथकाची कामगिरी प्रभावी वाहनाअभावी शून्य असून अपहार प्रवृत्त वाहकाला त्यामुळे अपहारात चालना मिळालेली आहे. यातूनच या विभागाचे नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)