शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अपंग मतदारांसाठी सुलभ निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:30 IST

प्रत्येक मतदार लोकशाहीचा अभिन्न अंग आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रि येमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकांदबरी बलकवडे : अपंग दिन कार्यक्रम आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रत्येक मतदार लोकशाहीचा अभिन्न अंग आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. त्यानुसार अपंग घटकातील प्रत्येक मतदाराला निवडणूक प्रक्रि येमध्ये सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने अपंग मतदारांमध्ये लोकशाही प्रक्रि येबाबत अधिक जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा या हेतूने ३ डिसेंबरला अपंग दिन साजरा करणेबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश असल्याचे जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.सुलभ निवडणूक जिल्हास्तरीय समितीची बैठक घेऊन व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसार करुन अपंग नव मतदारांचे सत्कार कार्यक्रमाचे साजरा करण्याचे निर्देश त्यांनी आयोजित बैठकीत दिले.हा कार्यक्र म प्रत्येक विधानसभा मतदार संघात राबविण्यात येणार असून तालुकानिहाय मतदार केंद्र स्तरावर, संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व बुथ अधिकारी यांना राबविण्याचे निर्देश दिले आहे. ३ डिसेंबरला प्रत्येक बुथ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नवीन नोंदणी झालेल्या अपंग मतदरांना निवडणूक प्रक्रि येत सहभागी होण्याबाबत तसेच मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा संदर्भात माहिती देऊन अपंग नव मतदारांचे सत्कार करु न अपंग दिन कार्यक्रम घेण्याची सूचना केली.अपंग मतदारांसाठी विविध शैक्षणिक संस्थामध्ये अपंग घटकांना सामावून घेण्याच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेत विविध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांना बलकवडे यांनी दिले. लोकशाहीमध्ये प्रत्येक घटक महत्वाचा असून या वेळेस सुलभ निवडणुकांची तयारी प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी