शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज मेडिकलच्या इमारत बांधकाम निधीचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:31 IST

गोंदिया : गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊन इमारत बांधकामासाठी ४४८ कोटी रुपयांचा निधी २०१६ मध्ये मंजूर करण्यात ...

गोंदिया : गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊन इमारत बांधकामासाठी ४४८ कोटी रुपयांचा निधी २०१६ मध्ये मंजूर करण्यात आला होता. मात्र, इमारत बांधकामासाठी हा निधी अपुरा पडत असल्याने अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे मेडिकलच्या बांधकामाला गती प्राप्त झाली नव्हती. मात्र, मंगळवारी राज्य शासनाने मेडिकलच्या इमारत बांधकामासाठी ६८९ कोटी रुपयांच्या अंदाज पत्रकाला प्रशासकीय मंजुरी बहाल केली आहे. त्यामुळे मेडिकलच्या इमारतीचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर

जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला मात्र, अद्यापही मेडिकलची इमारत तयार करण्यात आली नाही. त्यामुळे मेडिकलचा कारभार सध्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. यामुळे बऱ्याच समस्या येत आहेत. मेडिकलचे बरेच विभाग जागा नसल्याने सुरू करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांनासुद्धा मेडिकल कॉलेजचा फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. मेडिकलच्या डॉक्टर आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कुडवा परिसरात मेडिकल कॉलेजच्या इमारतीसाठी प्रशस्त जागासुद्धा मंजूर करण्यात आली आहे. मात्र, काही अडचणींमुळे हे बांधकाम रखडले होते. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर खा. प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्यासह, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीसुद्धा गोंदिया येथे भेट देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होेते. त्यानंतर मंगळवारी राज्य शासनाने गोंदिया मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामाच्या नवीन प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यासाठी ६८९ कोटी ४६ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मेडिकलच्या इमारत बांधकामाला आता युद्धपातळीवर सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

.............

प्रवेशाची क्षमता १५० जागांवर

गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. सुरुवातीला ५० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेला मंजुरी देण्यात आली होती. आता ती १५० करण्यात आली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा याची मदत होणार आहे.

.............

६५० खाटांची असणार क्षमता

शहरातील कुडवा परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी ६८९ कोटी ४६ लाख रुपयांच्या प्रशासकीय अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली आहे. एकूण ६५० खाटांचे हे रुग्णालय असणार आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना आराेग्याच्या दर्जेदार सुविधा मिळण्यास मदत होणार असून, नागपूरपर्यंत करावी लागणारी पायपीटसुद्धा करावी लागणार नाही.

...............

कोट

गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूृर करण्यात आले. मात्र, राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते; पण जिल्हावासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होतो. आता ६८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने मेडिकलच्या इमारतीचा मार्ग माेकळा झाला आहे.

-प्रफुल्ल पटेल, खासदार