शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

गुड न्यूज मेडिकलच्या इमारत बांधकाम निधीचा मार्ग सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST

जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला मात्र, अद्यापही मेडिकलची इमारत तयार करण्यात आली नाही. त्यामुळे मेडिकलचा कारभार सध्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. यामुळे बऱ्याच समस्या येत आहेत. मेडिकलचे बरेच विभाग जागा नसल्याने सुरू करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांनासुद्धा मेडिकल कॉलेजचा फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्दे६८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर : प्रशासकीय मंजुरी प्राप्त : दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होऊन इमारत बांधकामासाठी ४४८ कोटी रुपयांचा निधी २०१६ मध्ये मंजूर करण्यात आला होता. मात्र, इमारत बांधकामासाठी हा निधी अपुरा पडत असल्याने अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे मेडिकलच्या बांधकामाला गती प्राप्त झाली नव्हती. मात्र, मंगळवारी राज्य शासनाने मेडिकलच्या इमारत बांधकामासाठी ६८९ कोटी रुपयांच्या अंदाज पत्रकाला प्रशासकीय मंजुरी बहाल केली आहे. त्यामुळे मेडिकलच्या इमारतीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर जवळपास पाच वर्षांचा कालावधी लोटला मात्र, अद्यापही मेडिकलची इमारत तयार करण्यात आली नाही. त्यामुळे मेडिकलचा कारभार सध्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या इमारतीतून सुरू आहे. यामुळे बऱ्याच समस्या येत आहेत. मेडिकलचे बरेच विभाग जागा नसल्याने सुरू करण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णांनासुद्धा मेडिकल कॉलेजचा फारसा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. मेडिकलच्या डॉक्टर आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा यामुळे विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कुडवा परिसरात मेडिकल कॉलेजच्या इमारतीसाठी प्रशस्त जागासुद्धा मंजूर करण्यात आली आहे. मात्र, काही अडचणींमुळे हे बांधकाम रखडले होते. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर खा. प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्यासह, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनीसुद्धा गोंदिया येथे भेट देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होेते. त्यानंतर मंगळवारी राज्य शासनाने गोंदिया मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामाच्या नवीन प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यासाठी ६८९ कोटी ४६ लाख ८१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे मेडिकलच्या इमारत बांधकामाला आता युद्धपातळीवर सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

प्रवेशाची क्षमता १५० जागांवर गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. सुरुवातीला ५० विद्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेला मंजुरी देण्यात आली होती. आता ती १५० करण्यात आली आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा याची मदत होणार आहे. ६५० खाटांची असणार क्षमता शहरातील कुडवा परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी ६८९ कोटी ४६ लाख रुपयांच्या प्रशासकीय अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली आहे. एकूण ६५० खाटांचे हे रुग्णालय असणार आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना आराेग्याच्या दर्जेदार सुविधा मिळण्यास मदत होणार असून, नागपूरपर्यंत करावी लागणारी पायपीटसुद्धा करावी लागणार नाही. 

गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूृर करण्यात आले. मात्र, राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते; पण जिल्हावासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होतो. आता ६८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने मेडिकलच्या इमारतीचा मार्ग माेकळा झाला आहे. -प्रफुल्ल पटेल, खासदार

 

टॅग्स :Medicalवैद्यकीयprafull patelप्रफुल्ल पटेल