शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

१५ दिवसांत दोन कोटींची कमाई

By admin | Updated: November 19, 2016 00:38 IST

चारही दिशांकडे ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गोंदिया स्थानकाने यावर्षी दिवाळी व्हॅकेशनमध्ये चांगलीच कमाई केली आहे.

गोंदिया रेल्वे स्थानक : तिकीट विक्रीतून १.३६ कोटी तर आरक्षणातून ६३.११ लाखदेवानंद शहारे  गोंदियाचारही दिशांकडे ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गोंदिया स्थानकाने यावर्षी दिवाळी व्हॅकेशनमध्ये चांगलीच कमाई केली आहे. प्रवाशांनी रेल्वे प्रवासाला दिलेल्या पसंतीमुळेच गोंदिया रेल्वे स्थानकाला १ ते १५ नोव्हेंबर या केवळ १५ दिवसांच्या कालावधीत बुकिंग व आरक्षित तिकिटांच्या माध्यमातून दोन कोटी रूपये कमावणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे एरवी गोंदिया स्थानकातून दररोज जवळपास २० हजार प्रवासी रेल्वेगाड्यांत चढतात व एवढेच प्रवासी या स्थानकात उतरतात. मात्र उन्हाळ्याच्या सुट्ट्या, दिवाळी व्हॅकेशन व इतर धार्मिक जत्रेप्रसंगी प्रवाशांच्या संख्येत चांगली वाढ होते. तसेच गोंदिया स्थानकातून चंद्रपूर, बालाघाट, रायपूर व जबलपूर या चारही दिशांकडे रेल्वेगाड्या धावत असल्याने प्रवासांना कुठेही ये-जा करणे सोयीचे ठरते. त्यामुळेही दक्षिण-पूर्व-मध्य लोहमार्गावर सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे.नोव्हेंबर महिन्याच्या १ ते १५ तारखेपर्यंत गोंदिया स्थानकातून तब्बल ३ लाख १६ हजार १९४ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद आहे. त्याद्वारे १ कोटी ९९ लाख ५७ हजार २३६ रूपयांचे उत्पन्न स्थानकाला मिळाले. यात ३ लाख ०१ हजार ५०४ प्रवाशांनी बुकिंग आॅफिसमधून तिकिटे काढून प्रवास केला, त्याद्वारे स्थानकाला १ कोटी ३६ लाख ४५ हजार ९९६ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर १४ हजार ६९० प्रवाशांनी रिझर्वेशनच्या माध्यमातून प्रवास केला, त्याद्वारे स्थानकाला ६३ लाख ११ हजार २४० रूपयांचे उत्पन्न मिळाले. दिवाळी सुट्ट्यांमध्ये सर्वच गाड्यांमध्ये गर्दी असल्याने ही कमाई झाली.आॅक्टोबरमध्ये २.६४ कोटींचे उत्पन्नयावर्षी दिवाळी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असल्याने आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही गोंदिया रेल्वे स्थानकाला चांगलेच उत्पन्न झाले आहे. एकट्या आॅक्टोबर महिन्यात गोंदिया स्थानकावरून तब्बल ५ लाख ४१ हजार ९९२ प्रवाशांनी प्रवास केला. त्याद्वारे २ कोटी ६४ लाख०४ हजार ६०७ रूपयांचे उत्पन्न मिळाले. यात तिकिटे घेवून ५ लाख १९ हजार ५४६ प्रवाशांनी प्रवास केला, त्याद्वारे १ कोटी ८४ लाख ११ हजार ११७ रूपयांचे उत्पन्न मिळाले. तर याच महिन्यात २२ हजार ४४६ प्रवाशांनी रिझर्वेशनच्या माध्यमातून प्रवास केला, त्याद्वारे ७९ लाख ९३ हजार ४९० रूपयांचे उत्पन्न मिळाले. अशाप्रकारे आॅक्टोबर व १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत एकूण ८ लाख ५८ हजार १८६ प्रवाशांनी प्रवास केला व त्याद्वारे गोंदिया स्थानकाला एकूण ४ कोटी ६३ लाख ६१ हजार ८४३ रूपयांचे उत्पन्न केवळ दीड महिन्यात मिळाले.