शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कमवा व शिका अन् जीवन घडवा

By admin | Updated: August 5, 2015 01:55 IST

ऊमेद अभियानातून रोजगाराच्या संधी$$्निेगोंदिया : ‘कमवा व शिका’ या योजनेतून ग्रामीण भागातील होतकरू बेरोजगार युवकांना उत्तम रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहे.

गटविकास अधिकारी जमईवार : ऊमेद अभियानातून रोजगाराच्या संधी$$्निेगोंदिया : ‘कमवा व शिका’ या योजनेतून ग्रामीण भागातील होतकरू बेरोजगार युवकांना उत्तम रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहे. या संधीचा योग्य फायदा घेऊन आपले जीवन चांगले घडवावे, असे मत अर्जुनी-मोरगावचे गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी व्यक्त केले. अर्जुनी मोरगाव येथे रोजगार मेळावा पार पडला. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून एमपीटीएचे स्मितेश उंडाळे, एमपीटीएचे प्रदीप सोनवने, निलेश नितनवरे, अभिषेक बेलवनकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख, तालुका अभियान व्यवस्थापक योगिता हटोलकर यांची उपस्थिती होती. जमईवार पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील गरीब व होतकरू मुलांना आपल्या आर्थिक समस्येमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. याचा परिणाम अशा मुलांना कोणत्याही प्रकारचे तांत्रिक ज्ञान व कौशल्य आत्मसात नसल्याने नोकरी मिळत नाही. याकरिता एमपीटीव्दारे रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेद्वारे जिल्ह्यातील मुलांना रोजगारासोबत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. दहावी, बारावी व आयटीआय पास मुला-मुलींसाठी बीएससी एन इंडस्ट्रीयल सायन्स ही पदवी संबंधित मुलांना पुढील चार वर्षात प्राप्त होणार आहे. कंपनीमध्ये काम करताना किमान सात हजार ते नऊ हजार ५०० रुपयांपर्यंत विद्यावेतन देण्यात येणार आहे. संबंधित मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पदवी प्राप्त होणार आहे. पदवी प्राप्त होताच अशा अनुभवी उमेदवारांना त्याच कंपनीमध्ये चांगल्या नोकरीची संधी प्राप्त होणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. प्रास्ताविक प्रकाश फूलकुवर यांनी तर आभार विजय भुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी मनिष पटले, नासीर शेख, निशांत बंसोड, राजेश बारसागडे, सुरेंद्र भावे, वीणा सांगोडे, अमित सिंगरौरे, प्रणिता नकाशे व रिता दडमल यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)