शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
2
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
3
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
6
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
7
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
8
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
9
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
10
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
11
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
12
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
13
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
14
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
15
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
16
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
17
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
18
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
19
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
20
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी

पुढच्या वर्षी लवकर या...

By admin | Updated: September 28, 2015 01:56 IST

‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..’ असा जयघोष करीत आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत सर्वांनी ...

गोंदिया : ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..’ असा जयघोष करीत आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पाला रविवारी (दि.२७) निरोप दिला. गणरायाच्या विसर्जनाला सुरूवात झाल्याने शहरात सर्वत्र गणपतीच्या मिरवणुका दिसत होत्या. रविवारी सर्वाधिक विसर्जन असल्याने विसर्जनस्थळांवर एकच गर्दी दिसून येत होती. मांगल्याची देवता समजल्या जाणाऱ्या गणरायाच्या या उत्सवाची गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांतही ख्याती आहे. त्यात गोंदिया शहरातील गणपती उत्सवाची बात काही औरच आहे. येथील काही मोठ्या मंडळांकडून साजरा करण्यात येणाऱ्या उत्सवाचे आणि विसर्जन मिरवणुकांचे सर्वांना आकर्षण असते. बाहेरगावाहून भाविक शहरातील उत्सव बघण्यास येतात. १७ सप्टेंंबर रोजी मोठ्या थाटात गणरायांची स्थापना करण्यात आल्यानंतर गेले १० दिवस सर्वत्र नवचैतन्याचेच वातावरण होते. त्यामुळेच गणरायाला निरोप देण्याचा दिवस उजाडला तेव्हा भाविक भावूक झाले होते. रविवारी सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात झाल्याचे बघावयास मिळाले. कुणी हातात, कुणी डोक्यावर, कुणी हातठेल्यांवर तर कुणी चारचाकी वाहनांत गणरायांना वाजतगाजत घेऊन विसर्जनासाठी जात असल्याचे दिसले. गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका आकर्षणाचे केंद्रच होत्या. ढोलताशांवर नाचत आणि गुलाल उधळत तरूणाई ‘गणपती बाप्पा मोरया...’चा जयघोष करीत होते. रात्री उशिरापर्यंत मोठ्या मंडळांच्या मिरवणुका सुरू होत्या. (शहर प्रतिनिधी)जलाशयांवर एकच गर्दी शहरातील पांगोळी नदी, छोटा गोंदिया, खमारी, सरकारी तलाव, साई मंदिर नाग तलाव, रजेगाव घाट, छोटा गोंदिया देवतलाव येथे मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जन केले जाते. त्यामुळे या जलाशयांवर एकच गर्दी दिसून आली. हजारोंच्या संख्येतील घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपती विसर्जनामुळे त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासकनाकडूनही खबरदारी घेतली जात होती.पोलिसांचा चोख बंदोबस्त गणेश मंडळांच्या वाजतगाजत जाणाऱ्या मिरवणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागणारी कोणतीही घटना घडू नये म्हणून शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. चौकाचौकांत पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. यासह वाहतूक पोलीसही त्यांच्यासोबत होते. विसर्जन स्थळांवरही पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. याशिवाय पोलीस वाहनांतूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांची गस्त सुरू होती.