शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

खोलीकरण व वेस्टवेअर बांधकामात गैरप्रकार

By admin | Updated: July 11, 2017 00:46 IST

सुरगाव-चापटी येथील माजी मालगुजारी तलावातील गाळ काढून खोलीकरण करणे व वेस्टवेअरच्या पाळीचे बांधकाम नियमांना डावलून होत आहे.

गावकऱ्यांनी बंद पाडले काम : जि.प.सदस्यांची चौकशीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : सुरगाव-चापटी येथील माजी मालगुजारी तलावातील गाळ काढून खोलीकरण करणे व वेस्टवेअरच्या पाळीचे बांधकाम नियमांना डावलून होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी हे काम बंद पाडले. तर या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा परिषद सदस्य गिरीष पालीवाल यांनी या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सुरगाव-चापटी येथील दोनशे एकराच्या परिसरात व्यापलेला मोठा माजी मालगुजार तलाव आहे. सदर तलावापासून चापटी येथील समस्त शेतकऱ्यांच्या २५० ते ३०० एकर शेतजमिनीला बारमाही ओलिताची सोय होते. लघु पाटबंधारे उपविभागाच्यावतीने तलावाच्या दुरुस्तीचे काम वेळोवेळी करण्यात येते. तलावाचा वेस्टवेअर जमिनीच्या स्तरापासून ५ फूट उंच असल्याचे गावातील शेतकऱ्यांचे म्हणने आहे. ‘गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत सदर तलावाचे खोलीकरण करुन गाळ काढणे व वेस्टवेअर तसेच तुकूमाचे नव्याने बांधकाम करण्याचे काम ई-टेंडर पद्धतीने एका कंत्राटदाराला दिल्याचे सांगण्यात आले. खोलीकरण करताना निघालेला गाळ तलावाच्या पोटात न टाकता तलावाच्या पाळीच्या मागच्या बाजूला टाकण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा गाळ तलावाच्या आतमध्येच टाकण्यात आल्याचे प्रत्यक्षात पाहणी दरम्यान दिसून येत आहे. तलावाचे पाणी लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी पाळीच्या शेवटच्या दोन्ही बाजूला दोन तुकूम असताना, संबंधित कंत्राटदाराने मधोमध पाळ फोडून पाणी जाण्याचा मार्ग बनविण्याचा प्रयत्न केला. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्या कामाला विरोध झाल्याने अर्धवट फोडलेली पाळ पुन्हा बांधण्याचा प्रकार कंत्राटदाराने केला. कंत्राटदाराच्या मनमर्जी कामाला लगाम घालण्याचे काम संबंधित अधिकारी करु शकले नाही. जे पूर्वीचे दोन तुकूम होेते, तेच कायम ठेवून डागडुजी करुन नवीनीकरण केल्याचा प्रताप झाल्याचे दिसून येत आहे. तलावाचा वेस्टवेअरची पूर्वीची उंची ५ फूट होती. नव्याने बांधण्यात येत असलेला वेस्टवेअर जमिनीच्या समतल आहे. तो ३ फूट उंचीचा करावा, असा आग्रह गावातील शेतकऱ्यांनी केला. परंतु कंत्राटदार उंची वाढविण्यास तयार न झाल्याने अखेर गावकऱ्यांनी वेस्टवेअर बांधकामच बंद पाडले . तलाव खोलीकरण व वेस्टवेअरच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी उपविभागीय अभियंता घरतकर यांची गुरुवारी प्रत्यक्ष भेट घेऊन चापटी येथील शेतकऱ्यांनी केली. मात्र संबंधितांनी तात्काळ दखल न घेतल्याने गावकऱ्यांनीच तीव्र भूमिका घेऊन काम बंद पाडले.पालीवाल यांनी केली पाहणी जि.प.सदस्य गिरीष पालीवाल यांच्या क्षेत्रातील चापटी हे गाव असल्याने गावकऱ्यांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यावर त्यांनी गावकऱ्यांसह झालेल्या कामाचे निरीक्षण केले. याप्रसंगी तलावातून काढलेला गाळ तलावाच्या पोटात जमा असलेला दिसला. वेस्टवेअर जमिनीलगत बांधकाम झाल्याचे दिसले. सदर बांधकाम संशयास्पद असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना कामासंबंधी जाब विचारुन तलाव खोलीकरण व वेस्टवेअर बांधकामाची योग्य चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.