शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर दुर्गा, शारदा मांडणाऱ्या आठ मंडळावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:17 IST

भर रस्त्यावर दुर्गादेवीचे मंडप थाटून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया आठ मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देनियमाचे उल्लघंन केल्याचा ठपका : नोटिसीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भर रस्त्यावर दुर्गादेवीचे मंडप थाटून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया आठ मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्यात आला.शहराच्या इंगळे चौकात ३ ते १९ आॅक्टोबर दरम्यान सार्वजनिक दुर्गा मांडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे मंडळाचे अध्यक्ष तथा गोंदिया नगर परिषदेचे नगराध्यक्ष अशोक इंगळे (४५) रा. सिव्हील गोंदिया यांच्यावर सरोज घरडे यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.कन्हारटोली येथे स्थापन करण्यात आलेल्या दुर्गा देवीचे मंडप नियमाप्रमाणे बनविण्याकरीता १४९ जाफौनुसार नोटीस बजाविण्यात आले होते. परंतु त्या दुर्गा उत्सव समितीने रस्त्याचा एक तृतीयांश भाग रस्त्यावर घेतल्यामुळे त्या मंडळाचे अध्यक्ष बालाजी चुन्नीलाल नागपुरे (४०) रा. कन्हारटोली याच्या विरूध्द भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुनाटोली येथे स्थापन करण्यात आलेली दुर्गा देवीचे मंडप नियमाप्रमाणे बनविण्याकरीता १४९ जाफौनुसार नोटीस बजावण्यात आले होते.परंतु त्या दुर्गा उत्सव समितीने रस्त्याचा एक तृतीयांश भाग रस्त्यावर घेतल्यामुळे मंडळाचे अध्यक्ष मोहनलाल अडवानी (२७) रा. पुनाटोली याच्यांविरूध्द भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.कन्हारटोलीत पुन्हा दुसºया ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या दुर्गा देवीचे मंडप नियमाप्रमाणे बनविण्याकरीता १४९ जाफौनुसार नोटीस बजाविण्यात आले होते. परंतु त्या दुर्गा उत्सव समितीने रस्त्याचा एक तृतीयांश भाग रस्त्यावर घेतल्यामुळे त्या मंडळाचा अध्यक्ष कमल कालीपत चक्रवर्ती (५२) याच्याविरूध्द भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.जय मॉ दुर्गा समिती मामा चौक गोंदिया येथे स्थापन करण्यात आलेली दुर्गा देवीचे मंडप रस्त्यावर उभारण्यात आले. उत्सवापूर्वी पोलिसांनी रस्त्यावर मंडप उभारू नका अशा सूचना केल्या होत्या. परंतु त्यांनी न ऐकता मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे नानू मुदलीयार (५०) रा. मामा चौक गोंदिया याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.मनोहर चौक शारदा उत्सव मंडळ समिती मनोहर चौक जयस्तंभ चौक गोंदिया येथे स्थापन करण्यात आलेले दुर्गा देवीचे मंडप रस्त्यावर उभारण्यात आले. त्यांनी न रस्त्यावर मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे लाल साकला राठी रा. बजरंग नगर गोंदिया याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ गांधी प्रतिमा गोंदिया येथे स्थापन करण्यात आलेल्या दुर्गा देवीचे मंडप रस्त्यावर उभारण्यात आले. उत्सवापूर्वी पोलिसांनी रस्त्यावर मंडप उभारू नका अशा सूचना केल्या होत्या. परंतु त्यांनी न ऐकता मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे सुनील अग्रवाल रा. गांधी प्रतिमा गोंदिया यांच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.भवानी चौक गोंदिया येथे स्थापन करण्यात आलेल्या दुर्गा देवीचे मंडप रस्त्यावर उभारण्यात आले. उत्सवापूर्वी पोलिसांनी रस्त्यावर मंडप उभारू नका अशा सूचना केल्या होत्या. परंतु त्यांनी न ऐकता मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे ईश्वर शिवलानी राठी रा. शंकर चौक सिंधी कॉलनी गोंदिया याच्याविरूध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम २८३, २९१, १८८ सहकलम १०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.