शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना दिला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:23 IST

प्लास्टीक बंदीच्या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या पथकाने सोमवारी (दि.१) अचानक मोहीम छेडून शहरातील सहा व्यापाऱ्यांना दणका दिला. पथकाने या व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे दंड ठोठावला असून त्यांच्याकडील प्लास्टीक पिशव्या, थर्माकोल प्लेट व अन्य असे एकूण ६ किलो वजनाचे साहित्य जप्त केले.

ठळक मुद्देप्लास्टीक बंदी मोहीम : ३० हजार रूपयांचा दंड ठोठावला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्लास्टीक बंदीच्या मोहिमेंतर्गत नगर परिषदेच्या पथकाने सोमवारी (दि.१) अचानक मोहीम छेडून शहरातील सहा व्यापाऱ्यांना दणका दिला. पथकाने या व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे दंड ठोठावला असून त्यांच्याकडील प्लास्टीक पिशव्या, थर्माकोल प्लेट व अन्य असे एकूण ६ किलो वजनाचे साहित्य जप्त केले.प्लास्टीक बंदी लागू झाल्यानंतरही शहरात प्लास्टीक पिशव्या व थर्माकोल साहित्यांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेत, नगर परिषदेच्या पथकाने सोमवारी (दि.१) अचानकच शहारात मोहिम छेडली.या मोहिमेत पथकाने शहरातील अग्रवाल प्लास्टीक, साई भगत सेल्स, इंडिया बुट हाऊस, संतुलाल अग्रवाल, व्यंकटेश्वरा डिस्पोजल व वैशाली राज पुरोहित या व्यापाऱ्यांकडे धाड घालून पाहणी केली. यावेळी या व्यापाऱ्यांकडे प्लास्टीक पिशव्या व थर्माकोल साहित्य मिळून आल्याने पथकाने या व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रूपये दंड ठोठावला. पथकाने ३० हजार रूपयांचा दंड ठोठावत व्यापाऱ्यांकडील प्लास्टीक पिशव्या व थर्माकोल साहित्य असे ६ किलो वजनाचे साहित्य जप्त केले.पथकात नगर परिषदेचे अभियंता उमेश शेंडे, सुमेध खापर्डे, देवेंद्र वाघाये, लिपीक प्रवीण गडे, शिव हुकरे, आरोग्य निरीक्षक मनिष बैरिसाल, मुक ेश शेंद्रे, प्रफुल पानतवने, सुमित शेंद्रे, रोहीदास भिवगडे यांचा समावेश होता.