शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रेती-मुरूम व्यावसायिकांना दणका

By admin | Updated: July 22, 2016 02:35 IST

तालुक्यात रेती व मुरुमाचा व्यवसाय करताना नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ....

नियमाप्रमाणे दंड आकारणार : तहसीलदारांच्या धाकाने उभे केले ट्रॅक्टर आमगाव : तालुक्यात रेती व मुरुमाचा व्यवसाय करताना नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आणि नियमाप्रमाणे दंड आकारणी केली जाईल, अशी ठाम भूमिका तहसीलदार साहेबराव राठोड यांनी घेतली आहे. त्यांची ही भूमिका नियमबाह्यव्यवसाय करणाऱ्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे रेती, मुरुमाचा व्यवसाय करणाऱ्यांनी आपले २१ ट्रॅक्टर तहसील कार्यालयासमोर उभे केले आहेत. तहसीलदार राठोड यांनी यासंदर्भात सांगितले की, जो अवैधपणे मुरुमाची वाहतूक करतो त्यांच्याकडून १० हजार ८०० रुयये दंड व रेती अवैध नेली जाते त्यांच्याकडून ७ हजार ८०० ते ३२ हजार किंवा त्यापेक्षाही जास्त दंड वसूूल केला जाणार आहे. चोरी गेलेल्या अवैध गौण खनिजांची मौका तपासणी व वास्तविकता पाहून जास्त सुद्धा आकारणी केली जाईल. हा सर्व महसूल शासनजमा केला जाणार आहे. यावर ट्रॅक्टर मालकांशी चर्चा केली असता अगोदर अवैध रेती, मुरुम व्यवसाय करणाऱ्यांवर ५ हजार ४०० रुपये दंड वसूल केला जात होता. तीच कारवाई आता होणे गरजेचे आहे, असे ट्रॅक्टर मालकांचे मत आहे. त्यांच्या मते होणारी ही कारवाई व दंड जास्त प्रमाणात असल्याने त्याचा निषेध म्हणून ट्रॅक्टर तहसील कार्यालयाजवळ उभे करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करुन मुरुम चोरुन नेणाऱ्यावर १० हजार ८०० व रेती चोरणाऱ्यावर ७ हजार ८०० ते ३२ हजार किंवा त्यापेक्षा जास्त दंड आकारण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचे राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)