शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

विमुक्त भटक्या जमातीचा धडक मोर्चा

By admin | Updated: February 24, 2016 01:43 IST

भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी गोंदिया जिल्ह्यातील ....

संघर्ष वाहिनी : सातही तहसीलवर धडकगोंदिया : भारतीय राज्यघटनेचे महान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी गोंदिया जिल्ह्यातील ८ व भंडारा जिल्ह्यातील ७ अशा एकूण १५ तहसील कार्यालयांवर एकाच दिवशी दि.२९ ला विमुक्त भटक्या जमातीचा मोर्चा धडकणार आहे. संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषद नागपूर या सामाजिक संस्थेच्या आवाहनानुसार महत्वपूर्ण मागण्यांसाठी प्रत्येक तालुकास्तरावर मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील या मोर्च्यानंतर महाराष्ट्रातील इतर दोन-दोन जिल्ह्यात क्रमाक्रमाने सदर मोर्चे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी धडकणार असल्याची माहिती संघर्ष वाहिणीचे प्रमुख दिनानाथ वाघमारे आणि सहकाऱ्यांनी दिली आहे. विमुक्त भटक्या जमातींना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगर पालिका यामध्ये ११ टक्के स्वतंत्र आरक्षण द्या, क्रिमिलेअरची जाचक अट रद्द करा, राज्याच्या अर्थसंकल्पात विमुक्त भटक्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विशेष आर्थिक तरतूद करा, अनुसूचित जाती-जमातीच्या धर्तीवर व्हीजे-एनटीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर वसतीगृह तयार करावे, भूमिहिनांना पडीत जमिनी, बेघरांसाठी घरकूल योजना, बेरोजगारांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन अल्प दराने कर्ज योजना लागू करा, जननी सुरक्षा योजनेंतर्गत प्रसूती पश्चात मिळणारा निधी विमुक्त भटक्या जमातीच्या गरोदर महिलांनासुध्दा मिळावा, मच्छिमारांना २०० दिवस काम व विकास योजना लागू करा, अशा मागण्या असल्याचे संघर्ष वाहिनीचे कार्यकर्ते परेश दुरूगवार, अनिल मेश्राम, दिलीप कोसरे, जयचंद नगरे, धनपाल मेश्राम, रमेश मेश्राम, विनोद मेश्राम आदींनी कळविले.