शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कवडीही खर्च न करता ३२०० खड्डे खोदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 21:48 IST

शासनाने ३३ कोटी वृक्ष लागवडीचा भार ग्रामपंचायतींवर टाकला. ग्रामपंचायत छोटी असो किंवा मोठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर ३२०० रोपटे लावण्याचे टार्गेट देण्यात आले आहेत.एक खड्डा खोदायला २० रूपये मजुरी द्यावी लागते.

ठळक मुद्देशासनाचा फतवा: वेध वृक्षारोपणाचे

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने ३३ कोटी वृक्ष लागवडीचा भार ग्रामपंचायतींवर टाकला. ग्रामपंचायत छोटी असो किंवा मोठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर ३२०० रोपटे लावण्याचे टार्गेट देण्यात आले आहेत.एक खड्डा खोदायला २० रूपये मजुरी द्यावी लागते. त्यासाठी या खड्यांसाठी एका ग्रामपंचायतीला ६४ हजार रूपये द्यावे लागतील. खड्डे खोदकामाचे पैसे सरकार देणार नसून हे खड्डे लोकसहभागातून खोदून वृक्षारोपण करा असा सल्ला देण्यात आला. वृक्षारोपणासाठी एका ग्रामपंचायत अंतर्गत ३२०० खड्डे मोफत खोदायला कोण तयार होणार हा प्रश्न ग्रामपंचायतींसमोर निर्माण झाला आहे.कमी मजुरीतही कुणी काम करायला तयार नाहीत. त्यातल्या त्यात एक रूपयाही खर्च न करता एका ग्रामपंचायतीअंतर्गत तब्बल ३२०० खड्डे खोदून ३३ कोटी वृक्षारोपणाचे उद्दीष्टे साध्य करायचे आहे. जिल्ह्यातील ६९४ गावांत पाण्याची भीषण टंचाई असतांना जिल्हा परिषदेने पाणी टंचाईकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. महाराष्टÑÑात यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्टे ठेवण्यात आल्यामुळे जिल्हा परिषदेचा जोर फक्त वृक्षारोपणाकडे आहे. पाणी टंचाई निवारणार्थ बोलायला कुणी तयार नाही.प्रत्येक ग्रामपंचायतीला ३२०० रोपटे लागवड करण्याचे उद्दीष्टे दिल्यामुळे फक्त खड्डे किती खोदले ते सांगा असा प्रश्न सरपंच किंवा सचिवांना जि.प.विचारत आहे. मात्र त्यांच्या गावातील पाण्याच्या समस्येवर बोलायला किंवा समस्या सोडवायला कुणी तयार नाहीत.पावसाळ्यात मिळेल का पाणी?उन्हाळा चांगलाच तापत असतांना तोंडचे पाणी पळून डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली. परंतु निद्रावस्थेत असलेला ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तहानलेल्या गावांना पाणी देण्यासाठी असमर्थ ठरत आहे. उपयायोजना करायला तत्परता दाखवित नाही. उन्हाळात पाणी मिळणार नाही तर पावसाळ्यात पाणी मिळेल का असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.परिचराचे वेतन द्यायला पैसे नाहीतछोट्या ग्रामपंचायतींनाही मोठ्या ग्रामपंचायतींप्रमाणे सरसकट ३२०० खड्डे खोदण्याचे उद्दीष्टे देण्यात आले. लहान ग्रामपंचायतींकडे सामान्य फंडात परिचराचे वेतन द्यायला पैसे नसतात. त्यामुळे चार-चार महिने त्यांना वेतन दिले जात नाही. तर वृक्षारोपणासाठी खड्डे कुठून खोदावे,खड्डे लोकसहभागातून खोदण्याच्या सल्ला दिल्यामुळे या ३३ कोटी वृक्षारोपणाच्या योजनेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.पाणी टंचाई फक्त आराखड्यापुरतीअंगाची लाहीलाही होत असताना पिण्यासाठी पाण्याची टंचाई कुठे-कुठे आहे, याचा आढावा जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घेतला आहे. दुसऱ्या टप्यात १४३ तर तिसºया टप्यात ३९८ गावे व १५३ वाड्यात पाणी टंचाईची समस्या. या ६९४ गावांत भिषण पाणी टंचाई आहे असे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग गृहीत धरले. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी कसल्याही उपाय योजना करण्यात आल्या नाही. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग फक्त आरखडा मंजूर करून शांत बसला आहे.