शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

चारचाकी वाहनांमुळेच वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: May 30, 2015 01:12 IST

व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात लग्नसराईमुळे विविध प्रकारच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.

गोंदिया : व्यापारी शहर असणाऱ्या गोंदियात लग्नसराईमुळे विविध प्रकारच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. केवळ गोंदिया जिल्हाच नाही तर लगतच्या मध्यप्रदेशताली बालाघाट आणि छत्तीसगड राज्यातूनही अनेक जण येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे मार्केट परिसरात सकाळ-संध्याकाळ वाहनांची कोंडी होते. पण ही कोंडी भोंडण्यात वाहतूक नियंत्रण विभाग सपशेल अपयशी ठरत आहे.नेहरू चौक ते दुर्गा चौक आणि गांधी चौक ते श्री टॉकेज चौक यादरम्यानचा परिसरात गोंदिया शहरातील मुख्य मार्केट आहे. कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, भांडी, खेळण्याचे साहित्य, मोबाईलसह सर्व प्रकारच्या वस्तू याच मार्केटमध्ये मिळतात. त्यामुळे हे परिसर वर्षभरच गजबजलेला असतो. मात्र लग्नसराईमुळे आता बाहेरगावाहून येणाऱ्या खरेदीदारांची गर्दी जास्त आहे. अनेक जण चारचाकी वाहनांनी येतात. शहरात अधिकृतपणे वाहने पार्क करण्यासाठी कुठेही जागा नसल्यामुळे मार्केटच्या रस्त्यावरच वाहन ठेवले जाते. यामुळे त्या वाहनाच्या बाजुने उपलब्ध असणाऱ्या अल्पशा जागेतून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची एकच गर्दी होऊन कोंडी निर्माण होते. गोरेलाल चौक, खोजा मस्जिद चौकाचा परिसर या ठिकाणी तर दर १० मिनिटांनी वाहतुकीची कोंडी होते.आधीच मार्केट परिसरातील रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून दुकाने वाढविली आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद आहेत. त्यातच कोणत्याही व्यापाऱ्याने आपल्या दुकानासमोर वाहन ठेवण्यासाठी पुरेसी जागा सोडलेली नाही. त्यामुळे खरेदीसाठी येणारे ग्राहकच नाही तर काही व्यापाऱ्यांची स्वत:ची वाहनेही रस्त्यावरच ठेवलेली असतात. पण भर मार्केटमध्ये रस्त्यावर एका बाजूने वाहन ठेवले तरी वाहतुकीला मोठी अडचण जाते. मात्र आश्चर्य म्हणजे कोणत्याही चारचाकी वाहनावर वाहतुकीच्या नियमानुसार कारवाई होती. त्यामुळेच बिनधास्तपणे कुठेही गाडी लावण्याची सवय नागरिकांना झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)टोविंग व्हॅनचे भिजत घोंगडेनियमबाह्यपणे कुठेही चारचाकी वाहने पार्किंग करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांची वाहने उचलून नेऊन पोलीस ठाण्यात लावण्यासाठी दोन टोविंग व्हॅन आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष तरतूद करून त्या व्हॅन खरेदी करून दिल्या. मात्र गेल्या चार महिन्यांपासून त्या व्हॅनचा वापरच नाही. अजूनही त्या काही तांत्रिक दुरूस्तीसाठी पोलिसांच्या मोटर ट्रान्सपोर्ट (एमटी) विभागात पडून आहेत. वाहतूक नियंत्रण शाखेचे पो.निरीक्षक किशोर धुमाळ यांना याबाबत विचारले असता त्या व्हॅन येत्या १५ दिवसात वाहतूक नियंत्रण विभागाच्या ताब्यात दिल्या जातील असे सांगितले.दुचाकींवरच कारवाई का?वास्तविक दुचाकींपेक्षाही चारचाकी वाहनांमुळे वाहतुकीची जास्त कोंडी होते. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई न करता आतापर्यंत केवळ दुचाकी वाहनांनाच टार्गेट केले जात आहे. मार्केट परिसरातील काही मार्गावर वन-साईड पार्किगची व्यवस्था केली आहे. त्यामुळे एखादी गाडी चुकून दुसऱ्या बाजूने लागली किंवा थोडी रस्त्यावर लागली तर ती लगेच उचलली जाते. मात्र दुचाकीपेक्षा चार पट जागा व्यापणाऱ्या कारचालकाला मात्र साधा जाब विचारण्याची हिंमत वाहतूक नियंत्रण विभाग का करीत नाही? असा प्रश्न गोंदियावासीयांना पडला आहे.