शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दोनदा अर्ज करूनही घरकूल योजनेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 22:00 IST

घोगरा येथील वृद्ध नागरिक शालीक दयाराम बोरघरे (६०) हे दारिद्रयरेषेखाली असून त्यांचे घर पडक्या अवस्थेत आहे. जीव मुठीत घेवून जगत असताना त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला.

ठळक मुद्देघोगरा येथील वृद्ध नागरिक शालीक दयाराम बोरघरे (६०) हे दारिद्रयरेषेखाली असून त्यांचे घर पडक्या अवस्थेत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : घोगरा येथील वृद्ध नागरिक शालीक दयाराम बोरघरे (६०) हे दारिद्रयरेषेखाली असून त्यांचे घर पडक्या अवस्थेत आहे. जीव मुठीत घेवून जगत असताना त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला. मात्र त्यांचा रितसर दिलेला अर्ज बेपत्ता झाला आहे. त्याबाबत सरपंच व सचिवांना विचारणा केल्यावर ते टाळटाळीचे उत्तरे देत आहेत.शालीक बोरघरे यांच्या आईवडिलांचा मृत्यू झालेला आहे. सध्या त्यांच्या कुटुंबात दोन मुले व पत्नी असून घर पडक्या स्थितीत आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय तुमसरला जाऊन भाचाच्या घरी राहतात व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. गावातील घरी शालीक फक्त एकटेच असून आपला जीव मुठीत घेवून मोडक्या झोपडीत राहत आहेत. बोरघरे मोलमजुरी करुन आपले जीवन जगत आहेत. त्यांनी दोनदा घोगरा ग्रामपंचायतच्या आमसभेत रितसर अर्ज केला होता. मात्र दिलेले अर्ज कुठे गायब झाले, पत्ताच नाही. सरपंच, सचिव यांना विचारपूस केल्यास नेहमीच टाळाटाळीचे उत्तरे देतात. जोरदार पाऊस आल्यावर त्या झोपडीत राहणे त्यांना कठीण होते. त्यामुळे त्यांना संपूर्ण रात्र जागूनच काढावी लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून हे जीर्ण झालेले घर केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित अधिकाºयांनी चौकशी करुन त्यांना घरकूल मंजूर करावे, अशी मागणी होत आहे.