शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी पाईपमधून सुरु आहे ये-जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:04 IST

केंद्र आणि राज्य सरकार प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवून ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे तयार करीत आहे. ग्रामीण रस्त्यांना शहरी रस्त्यांशी जोडून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले जात आहे.

ठळक मुद्देमहिनाभरापासून कसरत : संबंधित विभागाचे दुर्लक्ष, मोठ्या घटनेची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : केंद्र आणि राज्य सरकार प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवून ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे तयार करीत आहे. ग्रामीण रस्त्यांना शहरी रस्त्यांशी जोडून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले जात आहे. मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षीत आणि वेळकाढू धोरणामुळे तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील एका कुटुंबाला मागील महिनाभरापासून पाईपमधून ये-जा करावी लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.प्राप्त माहितीनुसार धापेवाडा उपसासिंचन प्रकल्प टप्पा २ अंतर्गत वैनगंगा नदीचे पाणी चोरखमारा जलाशयात टाकण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता पाईप लाईन बसविण्याचे काम सुरु आहे. हे काम करताना मात्र वडेगाव येथील नागरिकांच्या जीवीताकडे दुर्लक्ष करुन काम केले जात आहे.स्थानिक भिवरामजी विद्यालय समोरील भागात नितीन लांजेवार यांचे घरासमोर पाईप लाईन करिता नाली खोदकाम करण्यात आले. तर नाली १५ फुट खोल व १५ फुट रूंद आहे. या नालीमुळे कुटुंबीयांच्या घरी ये-जा करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून काम करणाऱ्या कंपनीतर्फे घरासमोर नालीवर आडवा पाईप टाकण्यात आला आहे.सद्यस्थितीत लांजेवार कुटुंबीय मागील महिनाभरापासून त्या पाईप मधून ये-जा करीत आहे. मात्र पाईपमधून अधिक काळ जाणे-येणे करणे धोक्याचे असून जीवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लांजेवार कुटुंबीयांनी अनेकदा सदर कंपनीकडे रस्त्याबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीचे उत्तर देऊन याकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत कंपनीच्या स्थानिक पर्यवेक्षकांकडे विचारणा केली असता अनेक कामे शिल्लक असल्यामुळे सध्या काही करता येणार नसल्याचे सांगितले.कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मुरगन यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन घरी जाण्या येण्याचा मार्ग मोकळा करुन दयावा अशी मागणी नितीन लांजेवार व कुटुुंबीयांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा