शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

पावसामुळे बोदलकसा तलाव ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:24 IST

मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिरोडा तालुक्यातील बोदलकसा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. तर बोदलकसा नाल्याला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिरोडा तालुक्यातील बोदलकसा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. तर बोदलकसा नाल्याला पूर आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. रविवारी (दि.२६) सायंकाळपासून परिसरात पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला. त्यामुळे तालुक्यातील नदी नाले भरुन वाहत आहेत. इंदोरा-लेंडीटोली-मंगेझरी (गोविंदपूर) नाल्याला पूर आल्यामुळे मंगेझरी, गोविंदपूर, रुस्तमपूर, लेंडीटोला या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शालेय विद्यार्थी व कामगारांना तिरोडा येथे जाता आले नाही. तर इंदोरा, बरबसपुरा, नाल्यावर पूर आल्यामुळे इंदोरा, बरबसपुरा हा मार्ग बंद झाला होता. चिखली-इंदोरा-भिवापूर नाल्यावरुन ३ फुट पाणी वाहत असून वाहतूक बंद ठप्प झाली होती. तालुक्यातील बोदलकसा जलाशय १०० टक्के भरले असून ओव्हरफ्लो झाला आहे.