शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाघ पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे ‘त्या’ मुलांचा मृत्यू

By admin | Updated: June 5, 2017 00:52 IST

येथील चार ते पाच मुले शनिवार (दि.३) सिरपूर धरणाकडे आंघोळीला गेले असता धरणाच्या समोरच्या टाकीत दोन मुलांचा बुडूृन मृत्यू झाला.

नागरिकांचा आरोप : दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करालोकमत न्यूज नेटवर्कसिरपूरबांध : येथील चार ते पाच मुले शनिवार (दि.३) सिरपूर धरणाकडे आंघोळीला गेले असता धरणाच्या समोरच्या टाकीत दोन मुलांचा बुडूृन मृत्यू झाला. ही घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. दिगंबर उर्फ बंटी हेमराज कोसरे व नितेश सुरज कोसरकर अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत. ते दुपारी घरी न आल्यामुळे घरच्या लोकांनी इकडे-तिकडे शोध घेतला. परंतु त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. नंतर त्यांच्या मित्रांना विचारणा केली असता उलट-सुलट माहिती दिली आणि धरणाकडे आंघोळीला गेले असल्याचे म्हटले तेव्हा त्यांचे नातेवाईक आणि गावातील लोकांनी धरणाकडे धाव घेतली. धरणाजवळ सायकल उभी दिसली. धरणाच्या खालच्या टाकीकडे त्यांचे कपडे आढळले. प्रथम दिगंबर हेमराज कोसरे (१४) याचा मृतदेह तरंगत आढळला. नितेश सुरज कोसरकर (१४) याचा पत्ता लागला नव्हता. गावातील मासेमाऱ्यांकडून नितेशचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. तेव्हा प्रशासनाने गोंदियावरुन गोताखोरांना बोलविले. त्या टाकीत पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळला.दोन मुलांचा जीव गेल्यामुळे लोकांनी बाघ पाटबंधारे विभागावर आक्रोश व्यक्त केला. सिरपुरबांध येथील जलाशयावर दर दिवशी पर्यटक लोक येत असतात. परंतु त्यांच्या सुरक्षेविषयी काहीही उपाययोजना नसल्याकारणाने या ठिकाणी छोट्या-मोठ्या घटना घडतच असतात. या ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी हजेरी पटावर हजेरी लावून आपल्या कामाला निघत असतात. त्यांच्या अनुपस्थिती या धरणाची पूर्ण व्यवस्था वाऱ्यावरच असते. बाघ पाटबंधारे विभागाच्या अभियंता कर्मचाऱ्याचे जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. या ठिकाणी तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.संततप्त नागरिकांनी बाघ पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. बाघ पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी घटनेच्या दिवशी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करुन निलंबनाचे लिखीत आश्वासन दिले. शाखा अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांना सुद्धा निलंबीत करण्याची मागणी रेटून धरली. आ. संजय पुराम यांनी जिल्हाधिकारी यांना फोन करुन १२ तासाच्या आत उपकार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांना निलंबित करण्याची मागणी केली. या ठिकाणी लावण्यात आलेले पथदिवे अनेक दिवसापासून बंद आहेत.