शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसामुळे वन तलाव फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:55 IST

जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील मुरदोली, हिराटोला, कालीमाटी येथील चार वन तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देलाखो रुपयांचे नुकसान : बांधकामावर प्रश्नचिन्ह

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव तालुक्यातील मुरदोली, हिराटोला, कालीमाटी येथील चार वन तलाव फुटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे वनविभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कंत्राटदारामार्फत करण्यात आलेल्या तलावाच्या बांधकामावर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.प्राप्त माहितीनुसार मुरदोली, कालीमाटी व हिराटोला येथे (दोन वनतलाव) असे एकूण चार वनतलाव शासनाने २०१७-१८ यावर्षी मंजूर केले. त्या अनुषंगाने शासनाने माती काम मग्रारोहयो अंतर्गत तर पिचिंग व वेस्ट वेयरचे काम कंत्राटदारांना दिले होते. यातील चारही वन तलावाचे कामे जून २०१८ मध्ये पूर्ण करण्यात आले. दरम्यान जिल्ह्यात सोमवार आणि मंगळवारी झालेल्या संततधार पावसामुळे महिनाभरापूर्वी बांधकाम करण्यात आलेले चारही वन तलाव फुटले. तलावाची पाळ फुटल्याने सर्व पाणी वाहून गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रत्येक तलावाच्या कामासाठी शासनाने १५ लाख व उर्वरीत कामासाठी ९ लाख ९९ हजार असे एकूण एका तलावासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. शासनाच्या जलसंवर्धनाच्या उद्देशातूनया तलावांचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र चुकीच्या नियोजनाचा या वन तलावांना फटका बसला. वेस्टवेअरचे बांधकाम चुकीने केल्याने वन तलावाची पाळ फुटल्याचे बोलल्या जाते. विशेष म्हणजे हिराटोला येथील एका वन तलावाच्या पाळीची व वेस्ट वेअरची उंची जवळपास सारखीच असल्यामुळे पाळीला २० फुटाचे भगदाड पडले असल्याचे गावकºयांनी सांगितले. दरम्यान एकाच पावसाने २५ लाख रुपये खर्चून करुन तयार करण्यात आलेल्या वन तलावांच्या बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. यासर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.संततधार पावसामुळे वन तलावात भरपूर पाणी साचले, पाळीचे बांधकाम नुकतेच करण्यात आले होते. त्यामुळे तलावाची पाळ फुटली. मात्र लवकरच तलावाची दुरूस्ती केली जाईल.एस.एम.जाधव, वनक्षेत्राधिकारी गोरेगाव.