शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक मंदीमुळे धानाचे भाव पडले

By admin | Updated: June 28, 2015 01:10 IST

जागतिक मंदीमुळे धानाची निर्यात बंद झाली. धानाला योग्य भाव मिळेनासा झाला आहे, असे सांगतानाच शेतकऱ्यांनी धानाचे पिक बदलून आता दुसऱ्या पिकांकडे वळून आर्थिक संपन्नता साधली पाहीजे,

नितीन गडकरी : शेतकऱ्यांनी पिकात बदल करण्याची सूचनाआमगाव : जागतिक मंदीमुळे धानाची निर्यात बंद झाली. धानाला योग्य भाव मिळेनासा झाला आहे, असे सांगतानाच शेतकऱ्यांनी धानाचे पिक बदलून आता दुसऱ्या पिकांकडे वळून आर्थिक संपन्नता साधली पाहीजे, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. आमगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते.भाजपाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ना.गडकरी यांची जाहीर सभा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात दुपारी झाली. यावेळी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, खा.नाना पटोले, आ.संजय पुराम, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी आ.केशव मानकर, हेमंत पटले आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.प्रास्ताविक भाषणात विनोद अग्रवाल यांनी विरोधकांकडे मुद्देच नसल्यामुळे ते काहीतरी आरोप करून मतदारांचे लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला.ना.गडकरी यांनी आपल्या भाषणात गेल्या ६०-६५ वर्षांपासून सत्तारूढ असलेल्या काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. नेहरूजी, इंदिराजींच्या काळापासून आता राहुल गांधीपर्यंत सर्वजण गरीबी हटविण्याचा नारा देत आहेत. पण प्रत्यक्षात जनता तशीच आहे. नेत्यांची गरीबी मात्र दूर झाल्याचे ते म्हणाले. त्यांनी इतक्या वर्षात जे करून ठेवले ते बदलविणे एक वर्षात शक्य नाही. मात्र आमच्या पाच वर्षाच्या काळात नक्कीच बदल दिसेल असे ते म्हणाले.यावेळी त्यांनी ७० हजार कोटींचे विमान खरेदी करण्याच्या निर्णयावरही टिका केली. तत्कालीन सरकारची निती चुकीची होती. धानाचे भाव वाढले नाही हे सुद्धा तत्कालीन सरकारच्या चुकीच्या नितीचाच परिणाम असल्याचे ते म्हणाले.शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादन, मध, मच्छोत्पादन अशा वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करावे, असा सल्ला गडकरींनी दिला. (शहर प्रतिनिधी)शिवणकरांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळलाएकेकाळी भाजपाचे राष्ट्रीय नेता असलेले माजी मंत्री महादेवराव शिवणकर यांना भाजपाने वाळीत टाकले आहे. त्याचे पुत्र विजय शिवणकर राष्ट्रवादीच्या तंबूत गेले आहे. आमगाव आणि शिवणकर हे भाजपासाठी एक समीकरण होते. आता ती परिस्थिती राहिली नसताना प्रथमच गडकरी आमगावात आले. त्यामुळे ते शिवणकरांवर ताशेरे ओढण्याची संधी सोडणार नाही, असा अंदाज असताना त्यांनी जाणीवपूर्वक त्यांचा कोणताही उल्लेख भाषणात केला नाही.