शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By admin | Updated: July 9, 2015 01:29 IST

यंदा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी चिखलखारी टाकल्या असून अनेकांच्या शेतात पाण्याचा निचरा किंवा पाणी साठा प्रमाण कमी जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे पऱ्हे बिघडले आहेत.

गोरेगाव : यंदा तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी चिखलखारी टाकल्या असून अनेकांच्या शेतात पाण्याचा निचरा किंवा पाणी साठा प्रमाण कमी जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे पऱ्हे बिघडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.मागील दोन वर्षांपासून शेतकरी सतत नैसर्गिक संकटात सापडत आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी वाळला दुष्काळ. यंदा पावसाअभावी शेतकऱ्यांची रोपवाटिका वाळत आहे. त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.काही शेतकऱ्यांचे पऱ्हे पावसापूर्वी टाकल्याने चांगल्या प्रकारे बीज अंकुरित झाले व त्यांचे पऱ्हे घनदाट हिरवेगार उगवले आहेत. यंदा हवामान विभागाने पावसाबद्दल दिलेला अंदाज शेतकऱ्यांना खचित करणारा असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात धान पेरणी केलीच नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाकडे दुर्लक्ष करीत पावसापूर्वीच मृग नक्षत्रात पेरणी केली. मृग नक्षत्राच्या शेवटच्या दोन दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली आणि अनेक शेतकरी हळबडून जागे झाले व पेरणीच्या कामाला लागले. परंतु पाऊस जास्त आल्याने सर्वत्र शेतात पाण्याचा साठा झाला आणि नाईलाजाने अनेक शेतकऱ्याने चिखल तयार करुन पऱ्हे टाकले. चिखलाचे पऱ्हे कमी जास्त होत मागे पुढे अंकुरीत होतात किंवा टेकरभागात बियाणे जसेच्या तसे राहतात. त्यांना पाण्याची गरज असते. काही बियाणे पाणी साचलेल्या ठिकाणी सडण्याच्या अवस्थेत येतात. त्यांना पूर्वीपासून कोरडे वातावरण हवे असते. अशा परिस्थितीत कुठे साधते तर कुठे बिघडते, अशी अवस्था असते. ही परिस्थिती यंदा जवळपास ८० ते ९० टक्के शेतकऱ्यांच्या शेतात निर्माण झालेली आहे. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे, असे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)