शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: September 9, 2015 01:53 IST

पावसाळ््याचे तीन महिने संपूनही गेले तरी हवालदिल झालेला शेतकरी अन् शेतमजूर अजूनही चातकाप्रमाणे वाट बघत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

शेतकरी हवालदिल : कोरड्या दुष्काळाने हिरावला पुरणपोळीचा घास राहुल भुतांगे  तुमसरपावसाळ््याचे तीन महिने संपूनही गेले तरी हवालदिल झालेला शेतकरी अन् शेतमजूर अजूनही चातकाप्रमाणे वाट बघत आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आठवडाभरावर पोळा सण येवून ठेपला आहे. तरीही पाऊस बेपत्ताच असल्याने शेतकऱ्यांच्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. परिणामी शेतकऱ्याबरोबर दिवस-रात्र काळ््या मातीची (आईची) सेवा करत राब-राब राबणाऱ्या बैलांच्या व शेतकऱ्यांच्या मुखातील पुरणपोळीचा घास यंदांच्या दुष्काळाने हिरावून घेतल्याची खंत शेतकरी व्यक्त करित आहेत.तुमसर तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत तसेच चिखलाजिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या गणेशपूर, पवनारखारी, लोभी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, धुटेरा, चिखला, सितासांवगी, खंडाळे, गुढरी, सक्करदरा, मोकोटोला, चिचोली, राजापूर, हिरापूर, हमेशा, घानोड, भोंडकी, गोबरवाही, हेटी धामनेवाडा या गावात भीषण कोरड्या दुष्काळाचे चित्र बघावयास मिळत आहे. या गावातील ९० टक्के शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. मात्र पावसाने चांगलाच दगा दिल्याने गावातील तलाव तर सोडाच, परंतु जंगलव्याप्त रानतलावात बैलांना आंघोळ घालावी, इतकेही पाणी जमा झाले नाही. शेतकरी धान पिकाची शेती करणार तरी कसा, असा सवाल उपस्थित झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या हजारो हेक्टर जमिनी पडीकच ठेवल्याचे विदारक चित्र बघावयास मिळते. ज्या शेतकऱ्यांनी कसेबसे मिळेल त्या साधनांने धान पिकाची शेती केली त्या शेतकऱ्यांच्या विहरीच्या पाण्याने तळ गाठला आहे. परिणामी शेतात घातलेला हजारो रुपयांचा रासायनिक खत दृष्टीस पडत असून मोठमोठ्या भेगा शेतात पडल्या आहेत. पिके करपायला लागले आहेत. चारा-पाण्याअभावी अर्धपोटी असलेली अशक्त झालेली जनावरे दावणीला हंबरडा फोडतांना पाहून शेतऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळू लागले आहे. हिरव्या शेताचे गत वैभव आठवत परिसरातील शेतकरी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन देत आहेत. शेतकऱ्यांच्या पोळा सणानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाणी नाही आणि बाजारासाठी जवळ पैसे नाही.महागाईने उच्चांक गाठल्याने तिखटमिठावरच पोळा सण साजरा करण्याची वेळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांचा मित्र, आद्यदैवत बैलाना जिवंत ठेवण्याकरिता शेतकऱ्यांनी लावलेले मात्र पूर्णत: करपलेले पऱ्हे जनावरांसाठी वैरण बनविले आहेत.पोळा सण तोंडावर आला असून आता पावसाच्या आशा संपूर्णत: मावळत्या असून शासनानी या परिसरात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांचे पिक कर्ज माफ करावे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची व्यवस्था करुन शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळापासून दिलासा देण्याची गरज आहे.