लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बैल हे शेतकऱ्यांचे दैवत आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण पोळा शेतकरी साजरा करतात. स्थानिक परिसरात यावर्षी पोळा या सणाला दरवर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने झळत्यांच्या आवाजाने ग्रामीण भागात साजरा करणाचे संकेत शेतकरी देत आहेत.पोळा हा हिंदू लोकांचा अतिमहत्वाचा सण आहे. त्यापेक्षा अधिक शेतकरी बांधवाचा हा महत्वाचा सण असूनही या वेळी कसा साजरा करायचा हा प्रश्न निर्माण होतो. कृषी क्षेत्रात दिवसेंदिवस यांत्रिकरण वाढत आहे. त्यामुळे बैलांऐवजी शेतीच्या मशागतीची कामे आता ट्रॅक्टर व इतर साधनाच्या मदतीने केली जात आहे. वातावरणातील बदलामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न पशुपालक व शेतकºयांना भेडसावित आहे. त्यामुळे अनेक शेतकरी जनावरांची विक्री करीत आहे.परिणामी बैलांची संख्या कमी होत आहे. असे असले तरी शेतकरीबांधव आपल्या सर्ज्या-राजाप्रती पोळ्याला कृतज्ञता व्यक्त करण्याचे कधीच विसरत नाही. त्यामुळेच बैल कमी झाले असले तरी त्यांचे महत्त्व अजिबात कमी झ२ालेले नाही. पोळ्यात दरवर्षी बैल जोड्यांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. मात्र या सणाचे महत्व परंपरेनुसार आजही ग्रामीण भागात कायमच आहे. परिसरात बैल जरी जास्त नसले तरी त्यांच्या आठवणींना उजाळा देत यावर्षी खास पोळ्याच्या झळत्या सांगून पोळा साजरा करण्याचे संकेत शेतकरी देत आहेत. पोळ्यानिमित्त शेतकरीबांधवबैलांची सजावट करीत असतात. त्यामुळे बाजारपेठेत सजावटीच्या साहित्याची दुकाने सुध्दा सजली असल्याचे चित्र आहे.‘सांगून ठेवतो चौरंगीबेल पत्तीच्या झाडा,हर बोला हर हर महादेव’’...हे नमन कवडा पार्वतीहर हर महादेव....अशा अनेक झळत्यांनी ग्रामीण भागाचा पोळा सण दूमदूमणार असल्याचे चित्र आहे. परंतु निसर्गाच्या वागण्याने दरवर्षीपेक्षा या वर्षीचा पोळा शेतकरी आपल्या पोटाला आळ लावून आनंद देवून साजरा करू असेही म्हणतात. ही तर शेतकरी बांधवाची एक अविस्मरणीय आठवण ठेवणारी वेळ असते, असे बाराभाटी, येरंडी, देवलगाव, बोळदे, कवठा डोंगरगाव, कुंभीटोला, सुकळी, खैरी, चापटी, सुरगाव, पिंपळगाव, खांबी या गावकºयांची संकेत दर्शी अशी आगळी वेगळी पोळ्यावर चर्चा आहे.
बैल कमी झाले तरी महत्त्व कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:26 IST
बैल हे शेतकऱ्यांचे दैवत आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण पोळा शेतकरी साजरा करतात. स्थानिक परिसरात यावर्षी पोळा या सणाला दरवर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने झळत्यांच्या आवाजाने ग्रामीण भागात साजरा करणाचे संकेत शेतकरी देत आहेत.
बैल कमी झाले तरी महत्त्व कायम
ठळक मुद्देआज पोळा : कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण