शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

क्षयरूग्णांच्या मृत्यूसंख्येत घट

By admin | Updated: March 24, 2017 01:34 IST

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या सतर्कतेने आणि क्षयबाधितांच्या नियमित उपचारांमुळे नव्याने ग्रस्त होणाऱ्या क्षयरुग्णांच्या संख्येत घट होत आहे.

देवानंद शहारे  गोंदियाजिल्ह्यात आरोग्य विभागाच्या सतर्कतेने आणि क्षयबाधितांच्या नियमित उपचारांमुळे नव्याने ग्रस्त होणाऱ्या क्षयरुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तरीही जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ९०० क्षयरूग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७६८ क्षयरूग्ण नियमित औषधोपचाराने रोगमुक्त झाले. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी क्षयरूग्णांची मृत्यूसंख्या २३ ने कमी झाली. नियमित औषधोपचार व पर्यवेक्षकीय कामांमुळे जिल्ह्यात क्षयरूग्णांची मृत्यूसंख्याही घटत असल्याचे दिसून येते.‘मायकोबॅक्टेरिम ट्युबरकुलासिस’ या जिवाणूपासून क्षयरोग होतो. हा रोग संसर्गजन्य असून थुंकणे, शिंकणे व खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो. क्षयरोगाची लागण देशभरात प्रतिदिवशी एक लाख लोकांना होते. पाच हजार रूग्ण दरदिवशी क्षयरोगाचे बळी ठरतात. देशभरात दर तीन मिनिटाला दोन क्षयरूग्णांचा मृत्यू होतो. तसेच क्षयरूग्णाला एचआयव्ही-एड्स होण्याचे प्रमाण ५ टक्के असते तर एचआयव्ही-एड्स रूग्णाला क्षयरोग होण्याचे प्रमाण ९५ टक्के असते. मात्र नियमित औषधोपचार, सकस आहार व नियमित व्यायाम याद्वारे क्षयरूग्ण हमखास बरा होवू शकतो.मागील चार वर्षांचा कालावधी पाहता, सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्यात तीन लाख ६५ हजार ९६१ रूग्णांची तपासणी करण्यात आली. आठ हजार ४३५ थुंकी नमूणे गोळा करण्यात आले. यात ७४० थुंकी नमूणे सकारात्मक आढळले. तर थुंकी नमूणे सकारात्मक, नकारात्मक व फुफ्फुसेतर क्षयरूग्ण मिळून एकूण एक हजार २३० रूग्ण आढळले. नियमित औषधोपचाराने एक हजार ००१ क्षयरूग्ण बरे झाले, तर ९५ क्षयरूग्णांचा मृत्यू झाला होता. सन २०१४-१५ मध्ये पाच लाख ६५ हजार ७४० रूग्णांची तपासणी करण्यात आली. यात ११ हजार ४८९ थुंकी नमूणे गोळा करण्यात आले. त्यात ७५५ नमूणे पॉझिटिव्ह आढळले. थुंकी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह व फुफ्फुसेतर मिळून एकूण रूग्णसंख्या एक हजार १७९ झाली. नियमित औषधोपचाराने एक हजार ०१८ रूग्ण बरे झाले, तर ७२ रूग्णांचा मृत्यू झाला.सन २०१५-१६ मध्ये सहा लाख ३१ हजार ८४१ रूग्णांची तपासणी करण्यात आली. ११ हजार ६६४ थुंकी नमूणे गोळा झाले. त्यात ७९१ पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह व फुफ्फुसेतर मिळून एक हजार २४८ क्षयरुग्ण आढळले. यात औषधोपचाराने एक हजार ०१८ रूग्ण बरे झाले व ९२ क्षयरूग्णांचा मृत्यू झाला. तर सन २०१६-१७ मध्ये चार लाख ७० हजार ६५२ रूग्णांची तपासणी करण्यात आली. नऊ हजार ८३० थुंकी नमूणे गोळा झाले. एकूण क्षयरूग्ण ९०० आढळले. नियमित औषधोपचाराने ७७८ क्षयरूग्ण बरे झाले, तर वर्षभरात ६९ क्षयरूग्णांचा मृत्यू झाला. मागील चार वर्षांत एकूण चार हजार ५५७ क्षयरूग्ण आढळले. त्यापैकी नियमित औषधोपचाराने तीन हजार ७६० रूग्ण बरे झाले, तर ३२८ क्षयरूग्णांचा मृत्यू झाला. यात ८.७२ टक्के क्षयरूग्णांचा मृत्यू झाला. तर बरे होण्याची टक्केवारी ८२.५१ आहे.१० वर्षांत एमडीआर क्षयरोगाचे २१ बळीनियमित औषधोपचाराला दाद न देण्याऱ्या क्षयरूग्णांची एमडीआर/एक्सडीआर तपासणी केली जाते. जिल्ह्यात उपचाराखाली असलेल्या तब्बल एक हजार ८८१ क्षयरूग्णांची एमडीआर/एक्सडीआर तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०१ रूग्णांवर एमडीआर/एक्सडीआरचा (कॅटेगरी ४ व ५) औषधोपचार सुरू करण्यात आला. त्यामुळे २४ रूग्ण बरे झाले. पाच रूग्णांनी औषधोपचार पूर्ण केला. सन २००७ ते २०१७ दरम्यान तर २१ रूग्णांचा मृत्यू झाला. त्यात १५ रूग्णांनी नियमित औषधोपचार पूर्ण केला नाही. तर सहा रूग्णांवर औषधीने काम केले नाही. एमडीआरच्या दोन रूग्णांवर एक्सडीआरचा उपचार सुरू करण्यात आला. तीन एमडीआर रूग्णांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले. तर पाच एमडीआर रूग्ण दुसऱ्या जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात उपचारासाठी आले.उपचारापूर्वीच दोन एक्सडीआर क्षयरूग्णांचा मृत्यूसन २००७ ते २०१७ च्या फेब्रुवारीपर्यंत एक्सडीआर टीबीचे सहा क्षयरूग्ण आढळले. उपचारापूर्वीच त्यातील दोन रूग्ण दगावले. तर चार एक्सडीआर रूग्णांवर कॅटे-५ चा औषधोपचार सुरू करण्यात आला. त्यापैकी एक रूग्ण पूर्णत: बरा झाला, तर इतर तीन रूग्ण अद्यापही औषधोपचाराखाली आहेत.