शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ढगाळ वातावरणामुळे तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: December 13, 2015 01:59 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांच्या पूर्ण आशा तूर पिकावर होत्या मात्र त्या पिकावर विविध रोगाने आक्रमण केले.

शेतकरी चिंताग्रस्त : कृषी अधिकारी मार्गदर्शन करीत नाहीरावणवाडी : निसर्गाच्या लहरीपणामुळे धान पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांच्या पूर्ण आशा तूर पिकावर होत्या मात्र त्या पिकावर विविध रोगाने आक्रमण केले. चिंतातूर शेतकऱ्यांचा आशेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता शेतकऱ्यांना आतापासूनच सतावत आहे. यावर्षी धानाचा उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. तूरीचे पिक हाती येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र तेही हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशात वर्षभराचा कुटूंबाचा गाडा कसा चालवायचा वेळेवर आलेले प्रासंगीक खर्च करायचे कसे याची काळजी शेतकऱ्यांना आतापासूनच सतावू लागली आहे. परिसरातील शेतपिकाची एवढी गंभीर परिस्थिती असतानाही जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कुठलेही मार्गदर्शन मिळत नाही. शेतकऱ्यांचा शेतापर्यंत पोहचण्याची तसदी घेत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा दुहेरी संकटात सापडण्याची चिन्हे आता पासूनच दिसत आहे. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सरळ शेतकऱ्यांना बसत आहे. पावसाने बऱ्याच काळापर्यंत दही आणि आवश्यकतेच्या वेळी पावसाची माघारमुळे धानाचे नगदी पिक हातून गेले ऐनवेळी पावसाची गरज असताना त्यावेळी पाऊस बरसला नाही. त्यामुळे तूर पिकाचे उत्पन्न हाती येईलच अशी मनस्थिती शेतकऱ्याची होती. त्यातून कुटूंबाचा निर्वाह होईल मात्र उलटच होऊन नियमित ढगाळ वातावरणामुळे पिकावर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. यास्थितीत काय उपाय योजना करायला पाहिजे. त्याबद्दल शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत नाही. शेतकरी संकटात सापडले असताना त्यांना साधे मार्गदर्शन कृषी कार्यालयाकडून होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. (वार्ताहर)