शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

साईनाथ अ‍ॅग्री कंपनीतील राखेमुळे पिकांची राखरांगोळी

By admin | Updated: February 19, 2017 00:16 IST

धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करणाऱ्या एका कंपनीतुन धूर, गरम राख व रसायनयुक्त पाणी यामुळे मागील तीन वर्षात

शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ : तीन वर्षात शेतीचे लाखोंचे नुकसान खरबी (नाका) : धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करणाऱ्या एका कंपनीतुन धूर, गरम राख व रसायनयुक्त पाणी यामुळे मागील तीन वर्षात परिसरातील शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे. कंपनीचा कोट्यवधींचा फायदा होत असला तरी या प्रकारामुळे शेतकरी मात्र लाखो रूपयाने तोटा सहन करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे नुकसान भरपाईची मागणी करूनही कपंनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच प्रदूषण विभाग, कृषी विभाग व जिल्हाधिकारी यांना वारंवार तक्रार करून सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरी निराश आली आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या खरबी व खराडी परिसरातील शेतकरी मागील बराच वर्षापासून धान, भाजीपाला, हिरवी मिरची, तुळ, सोयाबीन, कपाशी, हरभरा अशी इतर अनेक पिके घेतली जाते. आतापर्यंत सुरळीत सुरू असलेल्या शेतपिकांचा उत्पादनाचे काम मागील तीन वर्षाचा अडचणीत आले आहे. कोंडबा हिवसे यांच्या शेतीला लागून तीन वर्षापूर्वी साईनाथ अ‍ॅग्री इंडस्ट्रीज नावाने धानावर प्रक्रिया करून तांदूळ तयार करण्याचा प्रकल्प उभारला गेला. आधुनिक पद्धतीच्या या प्रकल्पामध्ये धान उकळून तांदूळ निर्मिती करण्यात येत असल्याने भट्टीसाठी विजेचा उपयोग केला जातो. जळालेल्या धानाच्या कोंड्याची गरम राख व बाहेर पडणारी धुळ ही लगतच्या शेतामध्ये पिकांवर जाऊन पडत असल्याने पिकांची नासाडी होत आहे. गरम राखेमुळे व धुरामुळे शेतातील पिके करपत आहे. शेतामधील पीक काळेकुट्ट पडले आहे. शेतामध्ये मजूर काम करायला सुद्धा येत नाही. आल्यास मजूर दिवसभरात काळेकुट्टे होत असून शरीरावर इजा होण्याची शक्यता जास्त आहे. मागील तीन वर्षापासून शेतकऱ्याना हा त्रास सहन करावा लागत आहे. आतापर्यंत ५० लाखांचे नुकसान सहन करावे लागल्याची खंत शेतकऱ्याचा मुलगा हरीचंद्र हिवसे यांने ‘लोकमत’ला सांगितले. शेतकऱ्याने जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण विभाग, कृषी विभाग यांना मागील एका वर्षापूर्वीपासून तक्रार केली असून सुद्धा कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक कारवाई होताना दिसत नसल्याने येथील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. शेतकऱ्यांनी कर्ज फेडावे की पोट भरावे असा प्रश्न आता शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे. शेतकऱ्याने इच्छा मरणाची मागणीही केली आहे, असे शेतकऱ्याने बोलून दाखविले. लाखो रूपयांचे पीक देणारी शेती तीन भावाचे कुटूंब व शेतमजूरांच्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होती. मात्र उत्पादन येणे बंद झाल्याने कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. अखेरची आस म्हणून २० फेब्रुवारीला होणाऱ्या जनता दरबारामध्ये आपले प्रकरण सादर करून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. न्याय मिळावा या अपेक्षेवर शेतकरी काळवंटलेल्या पिकांकडे पाहून दिवस काढीत आहे. (वार्ताहर)