शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
4
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
5
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
6
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
7
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
8
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
9
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
10
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
11
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
12
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
13
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
14
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
15
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
16
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
17
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
18
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
19
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

दारूमुळेच होत आहेत महिलांचे संसार उद्ध्वस्त

By admin | Updated: March 8, 2015 01:14 IST

जिल्ह्यात पती-पत्नीत निर्माण होणारा कलह दारूमुळे होत आहे. पतीला दारूचे व्यसन जडल्यामुळे घर खर्चासाठी पैसे देत नाही म्हणून पती-पत्नीत कलह होऊन घटस्फोटापर्यंत प्रकरणे जातात.

लोकमतमुलाखतगोंदिया : जिल्ह्यात पती-पत्नीत निर्माण होणारा कलह दारूमुळे होत आहे. पतीला दारूचे व्यसन जडल्यामुळे घर खर्चासाठी पैसे देत नाही म्हणून पती-पत्नीत कलह होऊन घटस्फोटापर्यंत प्रकरणे जातात. याशिवाय नवीन जोडप्यांमध्येही एकमेकांना समजून घेण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातूनही घटस्फोटाच्या दारापर्यंत प्रकरणे येऊन ठेपतात. या प्रकरणांत समझोता घडवून आणण्यासाठी महिला समुपदेशन केंद्र प्रयत्नशील आहे. मात्र प्रत्येक पोलीस ठाण्याच्या स्तरावर यादृष्टीने अधिक चांगल्या पद्धतीने समुपदेशन झाल्यास अशा तक्रारींचे प्रमाण अजून कमी होऊ शकते, असे मत गोंदिया शहर ठाण्यातील महिला समुपदेश केंद्राच्या सहायक पोलीस निरीक्षक सरिता भांड यांनी व्यक्त केले.महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या येणाऱ्या तक्रारी, त्यामागील पार्श्वभूमी आणि उपाय यावर ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. महिलांच्या पती व सासुरच्या मंडळींविषयी करण्यात आलेल्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पोलीस विभागामार्फत जिल्हास्तरावर महिला समूपदेशन केंद्र तयार करण्यात आले. सन २०१४ या वर्षात पोलिसात सासरच्या मंडळींविषयी करण्यात आलेल्या ३९६ तक्रारी करण्यात आल्या. यापैकी १७८ प्रकरणात तडजोड करून त्यांना त्यांच्या संसारिक जीवनात या महिला तक्रार निवारण केंद्राने गुंतविले. समजावूनही ऐकत नसलेल्या ८१ दाम्पत्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा सल्ला शेवटी त्यांना देण्यात आला.वारंवार नोटीस पाठवूनही समझोता करण्यासाठी समूपदेशन केंद्रात न येणाऱ्या १०६ प्रकरणांना फाईलबंद करण्यात आले. सन २०१५ मध्ये ५५ प्रकरणे दाखल करण्यात आली. या सर्व प्रकरणांची परिस्थिती पाहता पतीला जडलेले दारूचे व्यसन, त्यातच घर सांभाळण्यासाठी पैसे देत नसल्यामुळे बहुतांश महिलांनी पतीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांत महिलांचे समूपदेशन करण्यासाठी पोलीस विभागाकडून समूपदेशन केंद्र नाहीत. मात्र गोरेगाव, सडक-अर्जुनी व आमगाव येथे पंचायत समितीकडून समूपदेशन केंद्र तर जिल्हा परिषदेकडून गोंदिया शहरात समूपदेशन केंद्र आहे. महिला व बालविकास आयुक्तालय, पुणेतर्फे दिशा महिला समूपदेशन जिल्ह्यातील तिरोडा, अर्जुनी-मोरगाव, देवरी व गोंदिया या चार पोलीस उघडण्यात आले आहेत. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी किंवा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यांत पोलीस विभागाकडून तक्रार निवारण केंद्र आहे. मात्र तिथे वकील उपलब्ध नाही. जी प्रकरणे त्या स्तरावर हाताळणे शक्य होत नाही त्यांना जिल्हास्तरावर पाठविले जाते. (तालुका प्रतिनिधी)हेल्पलाईनवर ४ वर्षापासून एकही तक्रार नाहीमहिलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी गोंदिया पोलीस विभागातर्फे सन २०११ मध्ये नियंत्रण कक्षात टोल फ्री हेल्पलाईन क्र.१०९१ हे तयार करण्यात आला. परंतु या हेल्पलाईनच्या क्रमांकावर मागील चार वर्षात महिलांची एकही तक्रार आली नाही हे विशेष. म्हणजेच महिलांच्या हेल्पलाईनविषयी जनजागृती करण्यात कुठेतरी कसर राहिली, असे यावरून म्हणता येईल.