शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

व्यसनमुक्ती दिंडीने दुमदुमली राईस सिटी

By admin | Updated: January 23, 2016 00:15 IST

एरवी एखादा मोर्चा, रॅलीने दुमदुमणारे गोंदिया शहर शुक्रवारी वेगळ्याच वातावरणाने भारावून गेले होते.

गोंदिया : एरवी एखादा मोर्चा, रॅलीने दुमदुमणारे गोंदिया शहर शुक्रवारी वेगळ्याच वातावरणाने भारावून गेले होते. राज्याच्या राजधानीपासून टोकावर वसलेल्या गोंदिया जिल्ह्यात आयोजित दोन दिवसीय चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी सकाळी ९ वाजता येथील इंदिरा गांधी स्टेडिअममधून निघालेली व्यसनमुक्ती दिंडी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. गोंदिया शहरातील व्यसनमुक्तीच्या चळवळीत स्वत:ला झोकून देणाऱ्या युवावर्गाने, सामाजिक कार्यकर्त्यांनी या दिंडीत उपस्थिती लावलीच तसेच शहारातील अनेक शाळा व महाविद्यालयातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने दिंडीमध्ये सहभाग घेतला. इंदिरा गांधी स्टेडियम येथे व्यसनमुक्ती दिंडीच्या शुभारंभप्रसंगी व्यसनमुक्तीच्या चित्ररथातून पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. यावेळी बोलताना पालकमंत्री बडोले म्हणाले, गोंदिया जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जातो. मागास व विकासापासून कोसो दूर असलेल्या गोंदिया जिल्ह्याला नैसर्गिक संपन्नता लाभली असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, इथल्या पर्यटनस्थळातून अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याची क्षमता आहे. देशाला बलशाली व संपन्न राष्ट्र करण्यासाठी इथला युवक आधी व्यसनमुक्त झाला पाहिजे. तरुणांच्या श्रमशक्तीचा वापर बलशाली महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी व्यसनमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प पालकमंत्र्यांनी यावेळी जाहीर केला. विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देऊन स्टेडियम परिसरात व्यसनमुक्तीची वातावरणनिर्मिती केली. यावेळी राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, महावीर मारवाडी उच्च माध्यमिक शाळा, मुन्नालाल चौहाण जनता हायस्कूल, चुटीया, नुतन विद्यालय, श्रीगुरूनानक हिंदी माध्यमिक महाविद्यालय, रवींद्रनाथ टागोर हायस्कूल, जे.एम. हायस्कूल, आदर्श हिंदी स्कूल, मनोहर नगरपरिषद माध्यमिक विद्यालय, मनोहर नगरपरिषद हायर सेंकडरी, एन.एम.डी. महाविद्यालय, गायत्री परिवार, प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेचा सेवकवर्ग यासह गोंदिया शहरातील अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. ही दिंडी स्टेडियम येथून नेहरु चौक-गोरेलाल चौक-गांधी पुतळा चौक येथे पोहोचली. यावेळी पालकमंत्र्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ही दिंडी संमेलनस्थळ असलेल्या स्वागत लॉन येथे पोहोचली. व्यसनमुक्ती दिंडीमुळे शहरात एक व्यसनमुक्तीचे वातावरण तयार झाले. अनेकांनी व्यसनमुक्त होण्याचा संकल्प केला. दिंडीतील पालखीमध्ये असलेले भारतीय संविधान, कल्याणी यात्रा, आनंद यात्री यासह अन्य व्यसनमुक्तीचा संदेश देणारी पुस्तके उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. (जिल्हा प्रतिनिधी)दिंडीत मान्यवरांचा सहभागविद्यार्थ्यांच्या हाती असलेले व्यसनमुक्तीचे घोषणाफलक लक्ष वेधून घेत होते. या दिंडीत पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासोबत संमेलनाध्यक्ष मुक्ता पुणतांबेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अभिनेत्री निशा परुळेकर, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विलास, ज्येष्ठ पत्रकार तुळसीदास भोईटे, अतिरिक्त समाजकल्याण आयुक्त स.प. पाटोळे, उपायुक्त पी.बी. बच्छाव, प्रादेशिक उपायुक्त नागपूर माधव झोड यांच्यासह गोंदिया शहरातील व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था, त्यांचे पदाधिकारी, विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले होते.