शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा तालुक्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 5, 2015 01:57 IST

तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या थांबल्या असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील जुन व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती.

शेतीची कामे खोळंबली : बळीराजाच्या डोळ्यात पाणी इंदोरा-बु. : तिरोडा तालुक्यात पावसाअभावी रोवण्या थांबल्या असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील जुन व जुलै महिन्यात पावसाने हजेरी लावली होती. यात शेतकऱ्यांनी शेतामध्ये धान रोवणी पासून शेतीची मशागत केली. जुलै महिन्यात पावसाने सुरवात केली परंतु शेतीला रोवणीसाठी पाहिजे तसा पाऊस आला नाही. धानाच्या खारी जगल्या परंतु अनेक शेतकऱ्यांनी धानाचे पऱ्हे अजुनपर्यंत लावले नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनीच रोवणी केली आहे. मात्र वरथेंबी पाण्यावर अवलंबून असलेल्या ६५ टक्के शेतकऱ्यांनी रोवणी केलेली नाही. त्यामुळे यंदा दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. तिरोडा तालुक्यातील चिरेखनी, पालडोंगरी, करटी-बु., करटी-खु., बघोली, परसवाडा, खैरलांजी, अर्जुनी, सावरा पिपरीया, बोरा, गोंडमोहाळी या गावात अनेक शेतकऱ्यांनी रोवणी केली नाही. या भागात पावसाळा लागला तेव्हा पासून बांध्यामध्ये साचेल असा पाऊस आलाच नाही. जुन-जुलै महिना संपला आॅगस्ट महिना लागला तरी पाहिजे तसा पाऊस जिल्ह्यात बरसलेला नाही. पाऊस कधी बसरणार याची वाट शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. ज्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या कमीपणामुळे हलक्या प्रतीच्या धानाची पेरणी केली आहे. त्या धानाची रोवणी आज घडीला झाली पाहिजे होती. परंतु पावसाअभावी रोवणी खोळंबली आहे. या महिन्याच्या सुरूवातीला पाऊस आला नाही तर हलके धान होणार नाही याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाऊस नसल्यामुळे धानाच्या खारी लाल झाल्या व मरणाच्या अवस्थेत आहेत. १५ आॅगस्ट पर्यंत धानाच्या रोवण्या झाल्या पाहिजे, तेव्हाच धानाचे पीक होऊ शकते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आॅगस्टचा पहिला आठवडा संपण्याच्या मार्गावर असूनही पाऊस आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रोवण्यांना घेऊन संभ्रमाची स्थिती आहे. एकीकडे रोवणी न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तर रोवणी झालेल्यांना आता रोवणी जगावी यासाठी पाण्याची गरज आहे. एकंदर ईकडे आड व तिकडे विहीर अशी पंचाईत शेतकऱ्यांची झाली आहे. त्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (वार्ताहर)