शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा डॉ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्करावणवडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील दोन तीन महिन्यापासून औषधांचा तुटवडा असल्याने दाखल रुग्णांना बाहेरुन औषध खरेदी करावी लागत आहे. याचा गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र आरोग्य विभागाने अद्यापही औषधांचा पुरवठा केला नसल्याने रुग्णांची समस्या कायम आहे.शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, ...

ठळक मुद्दे क्टराचे पद रिक्त : रुग्णांना आर्थिक भुर्दंड, आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्करावणवडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील दोन तीन महिन्यापासून औषधांचा तुटवडा असल्याने दाखल रुग्णांना बाहेरुन औषध खरेदी करावी लागत आहे. याचा गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र आरोग्य विभागाने अद्यापही औषधांचा पुरवठा केला नसल्याने रुग्णांची समस्या कायम आहे.शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु केले. मात्र जिल्हा आरोग्य विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे. रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील वर्षभरापासून स्थायी वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरोश्यावर काम सुरू आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाह्य रुग्ण तपासणी विभागात दररोज दोनशे ते तिनशे रुग्णांची तपासणी केली जाते. मात्र त्या तुलनेत आरोग्य केंद्रात सोयी सुविधांचा अभाव आहे.आरोग्य केंद्रात स्वच्छतेचा अभाव असून यामुळे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका रुग्णाला दुखापत झाली. आरोग्य केंद्रात दाखल होणाºया रुग्णांना डॉक्टर बाहेरुन औषधी खरेदी करुन आणण्यास सांगतात. याचे कारण रुग्णांनी विचारल्यास त्यांना आरोग्य केंद्रात औषधे उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.तर वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यापासून वंचित राहावे लागते. परिणामी बºयाच रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावा लागत असून याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. येथील लोकप्रनिधी व नागरिकांनी अनेकदा वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचे रिक्त पद भरण्याची मागणी केली. तसेच आरोग्य केंद्रात नियमित औषधांचा पुरवठा करण्यात यावा. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाºयांना निवेदन दिले. मात्र अद्यापही याकडे लक्ष देण्यात आले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे व वेळेवर उपचार होत नसल्याने रुग्णांची ओरड वाढली आहे.दरम्यान यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाºयाशी संपर्क साधला असता मागील काही दिवसांपासून औषधांचा नियमित पुरवठा होत नसल्याचे सांगितले.