शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

दीड महिन्यापासून पेयजल समस्या

By admin | Updated: May 6, 2016 01:29 IST

येथील अनेक वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. काही भागात तर अनेक दिवसांपासून नळांना पाणीच येत नाही.

तिरोड्यात पाणी पेटले : आमदार, मुख्याधिकारी व अभियंत्यांना निवेदनतिरोडा : येथील अनेक वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. काही भागात तर अनेक दिवसांपासून नळांना पाणीच येत नाही. बोअरवेल्ससुद्धा आटल्या आहेत. त्यामुळे तिरोडावासीयांचे घसे तहानेने व्याकुळ झाले असून त्वरित नळांद्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करा, अशी मागणी महिलांनी पाणी पुरवठा विभागाच्या शाखा अभियंत्यांना निवेदनातून केली आहे.डॉ.झाकीर हुसेन वॉर्ड, सी.जे. पटेल कॉलेज परिसर या भागात मागील दीड महिन्यांपासून नळांना पाणीच येत नाही. नळांतून फक्त हवा निघते. मग पाण्याचे बिल तुम्ही हवेसाठी देता का? असा सवाल वार्डातील महिलांनी केला आहे. शिवाय पाणी पुरवठा विभागात वारंवार फोनद्वारे सूचना देवूनही सुधारणा करणे तर दूर साधी चौकशी करण्यासाठी कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी येत नाही. नळांना पाणी येत नसल्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या घरून पाणी आणावे लागते. परंतु त्यांच्या विहिरीसुद्धा आता आटण्याच्या मार्गावर असल्यामुळे तेसुद्धा आता पाणी घेवू देत नाही. नळांना पाणी येत नसतानाही पाण्याचे बिल मात्र दर महिन्याला जेवढेच्या तेवढेच येते. त्यामुळे एप्रिल २०१६ चे पाण्याचे बिल आम्ही भरणार नाही, असा पावित्रा डॉ. झाकीर हुसेन वार्डातील महिलांनी घेतला आहे.प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होते. परंतु संबंधित विभागाच्या वतीने कसलीही स्थायी उपाययोजना करण्यात आली नाही. दरवर्षी उद्भवणारा पाण्याचा प्रश्न कुधी सुटेल? असा सवाल महिला करीत आहेत. डॉ. झाकीर हुसेन वार्ड व सी.जे. पटेल कॉलेज परिसरात वर्षभर प्रेशर राहत नाही. नागरिक फोन करून पाण्याची समस्या सांगतात. मात्र एका भागात भरपूर पाणी तर दुसऱ्या भागात एक थेंबसुद्धा पिण्याचे पाणी नाही, ही तिरोडा शहराची स्थिती आहे.टँकरची सोय कराया प्रकाराबाबत तिरोडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनाही निवेदन देवून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आमदार विजय रहांगडाले यांच्या कार्यालयात निवेदन देवून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी लक्ष देण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. ही समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी रविशंकर राऊत, शितल राऊत, निलकांता राऊत, प्रज्वल राऊत, ज्योती साखरे, प्रीती नंदागवळी, स्वीनल नंदागळवी, निलिमा सूर्यवंश्ी, मीरा मेश्राम, देवका कोचे, दिनेश राऊत आदी अनेक महिला-पुरूषांनी केली आहे.