शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अरूंद रॅम्पमुळे प्रवाशांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 21:39 IST

येथील रेल्वे स्थानकाच्या विकासात दरवर्षी भर पडत आहे. परंतु नवीन फलाटांवर तयार करण्यात आलेले रॅम्प अरूंद असल्यामुळे प्रवाशांना मोठी अडचण होत आहे.

ठळक मुद्देरेल्वेच्या नियमांचे उल्लंघन : अपघात टाळण्यासाठी रेल्वेने लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील रेल्वे स्थानकाच्या विकासात दरवर्षी भर पडत आहे. परंतु नवीन फलाटांवर तयार करण्यात आलेले रॅम्प अरूंद असल्यामुळे प्रवाशांना मोठी अडचण होत आहे. शिवाय फूट ओव्हर ब्रिजसुद्धा अरूंदच तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवासी रेल्वे नियमांचे उल्लंघन करून रॅम्पवरून न जाता लोहमार्ग ओलांडून जातात. हे प्रकार अपघाताला आमंत्र देणारे ठरत आहेत.गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ व ६ वर अत्यंत अरूंद रॅम्प आहे. केवळ दोन-तीन वर्षांपूर्वीच सदर रॅम्प तयार करण्यात आले. हे रॅम्पसुद्धा धोकादायक ठरू लागले आहे. या प्लॅटफॉर्मवरून विदर्भ व महाराष्टÑ एक्स्प्रेस सुटतात व येतात. याशिवाय बालाघाटच्या दिशेने ये-जा करणाºया गाड्यांमधून दरदिवशी हजारोंच्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. अशावेळी रॅम्पवरून फुट ओव्हरब्रिजवर चढण्यासाठी मोठी गर्दी होते. काही प्रवासी लवकर स्थानकाबाहेर पडण्यासाठी रेल्वे नियमांचे उल्लंघन करताना आढळतात.भविष्यात बालाघाटच्या पुढे रेल्वे मार्गाला देशाच्या उत्तर भागाशी जोडण्याची योजना आहे. अशात अतिरिक्त भार या दोन्ही प्लॅटफॉर्मवर दिला जाणार आहे. असे झाले तर सदर फूट ओव्हरब्रिज आवश्यकतेपेक्षा अधिक प्रवाशांचा भार सहन करू शकणार नसल्याचे बोलले जात आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अशास्थितीत या अरूंद रॅम्पच्या जागेवर नवीन तथा रूंद रॅम्पची गरज आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरसुद्धा सध्या एका नवीन फूट ओव्हरब्रिजचे काम करण्यात आले आहे. हे फूट ओव्हरब्रिजसुद्धा अत्यंत अरूंद अरून प्रवाशांची गैरसोय होणार आहे. परंतु रेल्वे प्रशासन नवीन अरूंद पूल तयार करण्यातच गुंतले आहे.एस्कलेटर बनेल तर रॅप्म हटेलप्लॅटफॉर्म क्रमांक ५ व ६ वरील रॅम्प अत्यंत अरूंद आहे. परंतु गोंदिया रेल्वे स्थानकाच्या सर्वच फलाटांवर एस्कलेटर मंजूर करण्यात आले आहेत. भविष्यात सर्वच फलाटांवर एस्कलेटर लागल्यावर रॅम्पची गरज पडणार नाही, असे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी