शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

विडी उद्योगास उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST

दिवसाही सुरू असतात पथदिवे गोंदिया : जिल्हास्थळ असलेल्या शहरात नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे भरदिवसाही पथदिवे सुरू असतात. त्यामुळे ...

दिवसाही सुरू असतात पथदिवे

गोंदिया : जिल्हास्थळ असलेल्या शहरात नगर परिषदेच्या दुर्लक्षितपणामुळे भरदिवसाही पथदिवे सुरू असतात. त्यामुळे नगर परिषदेवर विजेचा भुर्दंड बसत असतो. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

धान पिकाच्या भरपाईची मागणी

परसवाडा : परिसरामध्ये धान पिकावर किडीने आक्रमण केले असून, हाती आलेले पीक पूर्णपणे नष्ट होत आहे. धान पिकांचा पूर्णपणे निसवा झाला असून, पंधरा दिवसांमध्ये धान पिके निघणार होती. मात्र, धान निसवल्यावर किडीने आक्रमण केल्याने अनेकांच्या शेतातील धान पिकाची तणस झाली आहे. पंचनामे करून शेतकऱ्याला हेक्टरी हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याच्या मागणी केली आहे.

किसान सन्मान योजनेपासून वंचित

साखरीटोला : सरकारने कोरोना संकटकाळात दिलासा मिळावा यासाठी किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला. या योजनेतून अनेकांना लाभ मिळाला. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना वारंवार शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही योजनेचा लाभ मिळाला नाही.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता

तिरोडा : शहरातील उपमुख्य रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भरण घालण्यात आले असले तरी ते साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. आवागमनास अडथळा निर्माण होत आहे.

डासांचा प्रादुर्भाव वाढला

गोंदिया : शहरातील नाल्या उपसण्यात न आल्याने कचऱ्याने तुंबल्या आहेत. परिणामी डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंबंधी नगर परिषदेकडे निवेदने देण्यात आली. मात्र, अद्यापही नाल्या उपसण्यात आल्या नाहीत.

बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट

गोंदिया : तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तात्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

दुग्ध भेसळीच्या चौकशीची मागणी

सौंदड : दुधाची आवक कमी होऊनही दुधाचे वितरण व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात येत आहे. दुधात भेसळ करून पदार्थ तयार करण्याच्या सपाटा सुरू आहे. याची चौकशी करण्याची मागणी आहे.

शेंडा परिसरात नेटवर्कची समस्या

सडक -अर्जुनी : तालुक्यातील ग्राम कन्हारपायली, शेंडा, आपकरीटोला, उशिखेडा, पाटीलटोला, लेंदीटोला, मोहघाटा, दल्ली, लेंडीटोला, हलबीटोला, पांढरी मोबाइल टॉवर नसल्याने ग्राहकांची अडचण होते.

अल्प खर्चाचे शुभमंगल प्रेरणादायी

सडक -अर्जुनी : कोरोनामुळे विवाह समारंभावर ही बंधने आली आहेत. थेट आठ महिन्यांपासून बंद असलेली सामाजिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेली विवाह परंपरा सुरू झाली आहेत.

कचरापेट्यांअभावी दुर्गंधी बळावली

गोंदिया : येथील विविध वॉर्डांत नगर परिषदेच्या वतीने कचरा पेट्या ठेवण्यात न आल्याने ठिकठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. कुजलेल्या कचऱ्यामुळे किड्यांचा प्रकोप वाढला वाढला आहे.

रस्ता बांधकामामुळे शेतकरी व गावकरी अडचणीत

नवेगावबांध ­: कोहमारा ते नवेगावबांध-वडसा तसेच सानगडी - नवेगावबांध या राज्य महामार्गाचे काम शिवालया कंपनीद्वारे केले जात आहे. यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ज्या ठिकाणी वस्ती आहे, त्या ठिकाणी, सिमेंट काँक्रिटचे रोड व दोन्ही बाजूंना साधारण तीन फूट उंचीची नाली तयार केली जात आहे. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जिथे घरे व शेती आहे. अशा ठिकाणी दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड नसल्याने शेतकऱ्यांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.