शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

डॉट्स उपचार पद्धती क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:22 IST

क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून ज्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी होते अशा व्यक्ती क्षयरोगाने ग्रसित होतात. क्षयरूग्णांना बरे होण्यासाठी डॉट्स उपचार पध्दती म्हणजे क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम आहे, ....

ठळक मुद्देरमेश अंबुले : क्षयरोग जनजागृती रॅलीतून दिला क्षयरोगमुक्तीचा संदेश

ऑनलाईन लोकमतगोंदिया : क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून ज्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी होते अशा व्यक्ती क्षयरोगाने ग्रसित होतात. क्षयरूग्णांना बरे होण्यासाठी डॉट्स उपचार पध्दती म्हणजे क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन जि.प. आरोग्य व शिक्षण समिती सभापती रमेश अंबुले यांनी केले.जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण सोसायटी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय यांच्या संयुक्त वतीने जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. रूखमोडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल परियाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विशाल काळे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. चांदेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चौरागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एस. भुमकर उपस्थित होते.जागतिक क्षयरोग दिनानिमित्त प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच क्षयरोगाबाबत जनजागृती करणारे पत्रकांचे वाटप करण्यात आले. या वेळी क्षयरोग जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये जिल्हा जिल्हा क्षयरोग केंद्र गोंदिया येथील सर्व कर्मचारी तसेच दृष्टी बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. सचिन चौधरी, बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाचे कर्मचारी, नर्सिंग विद्यालयाचे प्रशिक्षणार्थी, राधाबाई नर्सिंग विद्यालयाचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सभागृह, केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय परिसर येथे क्षयरोग जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. उदघाटन जि.प. आरोग्य व शिक्षण समिती सभापती रमेश अंबुले यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. विशाल काळे, सी.बी. भुजाडे, प्रज्ञा कांबळे, धनेंद्र कटरे, हरिश चिंधालोरे, अमित मंडल, डी.सी. डोंगरवार, पंकज लुथडे, गजभिये, अग्रवाल, विलास राठोड, एच.एस. उईके, ज्योती आगाशे, प्रियंका पटले, सुभाष कापडणे, खरेद, राजू मेश्राम, रिजवाना शेख, संजय रेवतकर, रामचंद्र लिल्हारे, मंजुश्री मेश्राम यांनी सहकार्य केले. संचालन वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक पवन वासनिक यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ.बी.एस. भुमकर यांनी मानले.