शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST

बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणामुळे प्राणी जगतातील सुक्ष्मजीव मानवात प्रवेश करतात. कोरोना हा आजार शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून बाहेर पडतो. याशिवाय शिंकण्या-खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठ भागावर पडतात. अशा पृष्ठाभागाला स्पर्श केल्याने हे थेंब हाताला चिकटतात. हाताने वारंवार चेहरा, डोळे, नाक, चोळण्याच्या सवयीमुळे देखील हा आजार पसरू शकतो.

ठळक मुद्देडॉ.नितीन कापसे : स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचा दिला सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सोशल मीडियावर कोरोना संदर्भात अर्धवट माहिती असणारे चुकीचे, भीती पसरविणारे संदेश फिरताना दिसत आहेत. असे कोणतेही संदेश हे अधिकृत स्रोतांकडून खात्री करून घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत. तसेच आवश्यक असल्यास नागरिकांनी हेल्पलाईनला १०४ वर फोन करून शंका निरसन करून घ्यावे, असे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी लोकमतला सांगितले.कोरोना हे विषाणू समूहाचे नाव आहे. हे विषाणू भारताला पूर्वीपासून माहित आहेत. २००३ मध्ये आढळलेला सार्स हा आजार किंवा २०१२ मध्ये आढळलेला मर्स हा आजार हे सुध्दा कोरोना विषाणूमुळे होणारे आजार आहेत. परंतु डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या या उद्रेकात जो कोरोना विषाणू आढळला. तो विषाणू यापूर्वीच्या विषाणूपेक्षा वेगळा आहे. म्हणून त्याला नॉवेल अर्थात नवीन कोरोना असे संबोधण्यात येते.जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास ‘कोवीड-१९’ असे नाव दिले आहे. कोरोना हा प्राणी जगतातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळात आढळतो.बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय इत्यादी कारणामुळे प्राणी जगतातील सुक्ष्मजीव मानवात प्रवेश करतात. कोरोना हा आजार शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून बाहेर पडतो. याशिवाय शिंकण्या-खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पृष्ठ भागावर पडतात. अशा पृष्ठाभागाला स्पर्श केल्याने हे थेंब हाताला चिकटतात. हाताने वारंवार चेहरा, डोळे, नाक, चोळण्याच्या सवयीमुळे देखील हा आजार पसरू शकतो. करोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही.रूग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जातात. कोरोनाची लक्षणे ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेशी निगडीत असतात. ही सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारासारखीच असतात. ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, न्युमोनिया,काहीवेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे आढळतात.बाधीत देशातून आलेल्या प्रवाश्यांचा पाठपुरावा,आपले हात वारंवार धुवावेत. निकटचा संपर्क टाळावा, डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळावेत. उघड्यावर थुंकू नये असा सल्ला डॉ.नितीन कापसे यांनी दिला आहे.अशी घ्यावी काळजीकोरोना किंवा श्वसनावाटे पसरणाऱ्या स्वाईन फ्लू, क्षयरोग असे आजार टाळण्यासाठी श्वसनसंस्थेचे विकार असणाºया व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे,हात वारंवार धुणे,शिंकताना,खोकतांना नाका-तोंडावर रूमाल अथवा टिशू पेपर धरावे. अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये, फळेभाज्या न धुता खाऊ नये.यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावाताप, खोकला, श्वसनास त्रास होणाऱ्या व्यक्तीहा त्रास कोणत्या आजारामुळे होतो आहे हे स्पष्ट होत नसल्याने व रूग्णाने कोरोनाबाधित देशात प्रवास केला असता.प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि ज्यांनी नुकताच बाधित देशात प्रवेश केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना