शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

कानातल्या बुरशीला घाबरू नका, पण काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 05:00 IST

कानातील बुरशी हा सामान्य आजार असून यापासून घाबरण्याची गरज नाही. मात्र कोणत्याही बुरशीवर वेळीच उपचार गरजेचा असल्याने काळजी घेण्याची गरज असल्याचेही डॉ. भगत यांनी सांगितले. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसतात रुग्णांनी कान, नाक, घसा तज्ज्ञांशी संपर्क साधून वेळीच उपचार करुन घ्यावा. तसेच नियमित आरोग्य तपासणी करीत राहावे. 

ठळक मुद्देकोणत्याही वस्तूने सफाई नको : वेळीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोना आजारातून बरे झालेल्या रूग्णांना मध्यंतरी म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने ग्रासले होते. अत्यंत गंभीर असा हा बुरशीचा प्रकार असल्याने सर्वांनाच धडकी भरली होती. मात्र या आजाराचे प्रमाण आटोक्यात आले असतानाच आता कानातल्या बुरशीच्या तक्रारी वाढल्या आहेत. कान-नाक-घसा तज्ज्ञ याला  ‘ओटोमायकोसिस’ असे म्हणतात. पावसाळ्यात बुरशीमुळ‌े हा आजार जास्त प्रमाणात उद्भवत असून त्यातही मधुमेह असलेल्या व्यक्तींना होण्याचे प्रमाण जास्त आहे. शिवाय गर्भवती महिलांना सतत कानाला रुमाल बांधून ठेवणे किंवा कानात कापसाचे बो‌ळे टाकून ठेवणे यामुळेही हा आजार होत असल्याचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. संजय भगत यांनी सांगीतले. कानातील बुरशी हा सामान्य आजार असून यापासून घाबरण्याची गरज नाही. मात्र कोणत्याही बुरशीवर वेळीच उपचार गरजेचा असल्याने काळजी घेण्याची गरज असल्याचेही डॉ. भगत यांनी सांगितले. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसतात रुग्णांनी कान, नाक, घसा तज्ज्ञांशी संपर्क साधून वेळीच उपचार करुन घ्यावा. तसेच नियमित आरोग्य तपासणी करीत राहावे. 

काय काळजी घ्यावी - कानाला विशेषत: काहीच करण्याची गरज नसते. मात्र तरिही पावसाळ्यात कानातल्या बुरशीच्या तक्रारी वाढतात. अशात कानात कोणतीही टोकदार वस्तू किंवा इअर बड टाकून स्वच्छ करू नये. यामुळे आणखी अन्य तक्रारी निर्माण होता. तसेच हेडफोन वापरत असल्यास त्याला वारंवार निर्जंतुक करावे. कान स्वच्छ करण्यासाठी आपल्या डॉक्टरांशीच संपर्क साधावा. 

कशामुळे होते बुरशी- गर्भवती महिलांचे कान जास्त दिवस बंद ठेवले जातात व अशात कानात बुरशी होण्याची शक्यता बळावते. याशिवाय मधुमेह असलेल्या व्यक्तींना कानातील बुरशी होण्याची शक्यता जास्त असते. विशेष म्हणजे, कानाला काहीही करण्याची गरज नाही. मात्र तरीही कान ओले असल्यास  हेडफोन वापरत असल्यास हा आजार होऊ शकतो.  कान खाजवणे, पस येणे व कान दुखणे अशा तक्रारी असल्यास मात्र आपल्या डॉक्टरांशी लगेच संपर्क साधावा. 

कानातली बुरशी हा प्रकार पावसाळ्यात जास्त प्रमाणात उद्भवतो. मधुमेह असलेल्या व्यक्तींना याची जास्त शक्यता असते. यामुळे कानात खाज येणे, पस वाहने किंवा कान दुखत असल्यास कोणत्याही टोकदार वस्तू किंवा इअर बडने स्वच्छ करू नये. कानात बुरशीचे निदान करून ती काढावी लागते व औषधोपचार करावा लागतो. यामुळे घाबरू नका मात्र काळजी घ्या व डॉक्टरांशी संपर्क साधावा. - डॉ. संजय भगत, कान-नाक-घसा तज्ज्ञ, गोंदिया. 

पावसाळ्याच्या दिवसांत कानात बुरशी होण्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात होतात. अशात पावसात भिजणे टाळावे. तसेच कान ओले होऊ देऊ नये व ओले झाल्यास लगेच पुसून कोरडे करावे. कानातल्या बुरशीत सुरुवातीला कान बंद होतो व त्यानंतर दुखणे सुरू होते. अशात बुरशी काढावी लागते व औषधोपचार करावा लागतो. त्यामुळे दुर्लक्ष न करता लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. - डॉ. लता जैन, कान-नाक-घसा तज्ज्ञ, गोंदिया

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या