शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा प्रकल्पासाठी कुणी जागा देता का जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 05:00 IST

दीड लाख लाेकसंख्या असलेल्या गोंदिया शहरातील केरकचऱ्याची विल्हेवाट सध्या नगरपरिषदेकडून शहरालगतच्या मोकळ्या जागेवर केली जात आहे. मात्र, हा कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने या परिसरालगतच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच केंद्र सरकारकडून मागील दहा वर्षांपासून स्वच्छता अभियान व स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पात गोंदिया नगर परिषदेचा क्रमांक दरवर्षी घसरतच चालला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया नगरपरिषदेच्या स्थापनेला १०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला असला तरी अद्यापही शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा प्रकल्प उभारण्यात नगरपरिषदेला यश आले नाही. त्यामुळे मागील १० वर्षांपासून नगरपरिषदेची घनकचरा प्रकल्पासाठी शहरालगतच्या गावांकडे कुणी जागा देता का जागा ? असे म्हणत भटकंती करण्याची वेळ आली आहे. पण अद्यापही एकाही गावाने याला हिरवी झेंडी दिली नाही. दीड लाख लाेकसंख्या असलेल्या गोंदिया शहरातील केरकचऱ्याची विल्हेवाट सध्या नगरपरिषदेकडून शहरालगतच्या मोकळ्या जागेवर केली जात आहे. मात्र, हा कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने या परिसरालगतच्या नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच केंद्र सरकारकडून मागील दहा वर्षांपासून स्वच्छता अभियान व स्मार्ट सिटी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पात गोंदिया नगर परिषदेचा क्रमांक दरवर्षी घसरतच चालला आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे गोंदिया नगर परिषदेकडे केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असलेल्या घनकचरा प्रकल्पाचा अभाव होय. घनकचरा प्रकल्प नसल्याने स्वच्छता अभियान राबवूनदेखील कमी गुण मिळत आहेत. घनकचरा प्रकल्पासाठी जागा मिळत नसल्याने नगरपरिषदेच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

लाखो टन कचऱ्याची उघड्यावरच विल्हेवाट - गोंदिया शहरात ४० वॉर्ड असून या वॉर्डामधून दररोज १०० हून अधिक गाड्या कचरा निघतो. नियमानुसार या कचऱ्याचे संकलन करून व त्यावर प्रक्रिया करून उर्वरित कचऱ्याची घनकचरा प्रकल्पात योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. पण या प्रकल्पासाठी जागाच उपलब्ध नसल्याने सर्व कचरा शहरालगत असलेल्या मोकळ्या जागेवर टाकला जात असून यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध - नगरपरिषदेकडे घनकचरा प्रकल्प असणे आवश्यक आहे. तशा स्पष्ट सूचना सुद्धा नगर विकास मंत्रालयाने दिल्या आहेत. शिवाय यासाठी लागणारा ८ लाख रुपयांचा निधीसुध्दा उपलब्ध करून दिला आहे. पण नगरपरिषदेला जागेचा शोध घेण्यात अद्यापही यश आले नाही. 

नगरपरिषदेला नोटीस देऊन प्रदूषण विभाग मोकळा- मागील वर्षी नगरपरिषदेतर्फे शहरातील मोकळ्या जागेवर टाकल्या जात असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली होती. यामुळे मोठ्या प्रमाणत दुर्गंधीयुक्त वायू प्रसारीत झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. यावर नागरिकांची ओरड वाढल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोंदिया नगरपरिषदेला नोटीस बजावून दोन महिन्यांत घनकचरा प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले होते. पण याला आता वर्ष लोटले असून यानंतरही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. 

आता हिरडामालीकडे धाव - घनकचरा प्रकल्पासाठी टेमनीनंतर सोनपुरी गावाने सुद्धा नकार दिला आहे. त्यामुळे आता गोंदिया नगर परिषदेने हिरडामाली परिसरातील एमआयडीसी परिसरात जागा उपलब्ध करून देण्यासाठी धाव घेतल्याची माहिती आहे. यात तरी नगरपरिषदेला यश येते का याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :dumpingकचरा