गोंदिया : गोरेगाव येथील शासकीय गोदामात येणाऱ्या गोरेगरीबांचे हक्काचे तांदूळ व गहू त्यांना न देताना त्याची परस्पर विल्हेवाट लावून लाखो रुपयांनी लुटण्याचा प्रकार उघडकीस आला. मात्र या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांच्या हाती केवळ कर्मचारी वर्गच लागला असून या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेले खरे आरोपी अजूनही अटकेबाहेर आहेत. सदर शासकीय धान्य गणेश राईस मिलमध्ये जात होते. त्यामुळे पोलिसांनी गणेश मिलचे संचालक पप्पू उर्फ संतोषकुमार फापट यांच्याविरूद्ध कलम ४०८, ३४ तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यापासून फापट गायब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय स्वस्त धान्य दुकानासाठी येणाऱ्या मालाची अफरातफर करण्याचा हा गोरखधंदा बिनबोभाटपणे सुरू होता. यात राईस मिलच्या संचालकासह शासनाचेही काही अधिकारी-कर्मचारी गुंतले असल्याचे बोलले जाते. गोदामात नव्याने बदलून आलेले स्टोअर किपर गेडाम यांना गोदामातील माल आणि प्रत्यक्ष रजिस्टरवर नोंद असलेला माल यात तफावत आढळल्याने त्यांनी चार्ज घेण्यास नकार दिला. तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी तपासणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. (जिल्हा प्रतिनिधी) फापडला जामीन नाही ४या प्रकरणात पोलिसांना हव्या असलेल्या आरोपींपैकी गणेश राईसचे संचालक संतोषकुमार फापड यांनी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केला. मात्र दोन वेळा सुनावणी पुढे ढकलली.
धान्य घोटाळ्यातील मास्टरमार्इंड देताहेत चकमा
By admin | Updated: October 4, 2016 01:19 IST