शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या ट्रकमधून कागदपत्रे व रक्कम पळविली

By admin | Updated: June 20, 2017 00:59 IST

सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून चोरीच्या बातम्यांनी खळबळ उडाली आहे.

हातसफाई : तपासणीच्या नावावर ३० हजारांचा डल्लालोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून चोरीच्या बातम्यांनी खळबळ उडाली आहे. तालुक्यात चोरांच्या धुमाकुळाने नागरिक त्रस्त आहेत. परंतु चोराच्या मुसक्या आवळणारे अधिकारीच जर निष्काळजीपणाने आपली कामे करीत असतील किंवा जबाबदारीच्या नावाखाली चोरीला पुढाकार देत असतील तर नागरिक न्याय मागायला जाणार तरी कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. उभ्या वाहनातून कागदपत्रे व पैशाची चोरी झाल्याची घटना घडली आहे.सौंदड ते फुटाळा नॅशनल हायवे क्र.६ वरील जागेत १३ जून रोजी सकाळी ६.३० वाजता ट्रकच्या (एचआर-३८ यू-३८७९) चालकाने आपला ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. गुरुभेजसिंह गुरजीतसिंह संधू रा. चोलासाहेब (जि. रततारण, पंजाब) असे त्या चालकाचे नाव आहे. जमदेशदपूरवरुन बॉम्बे भिवंडीला जात असताना नॅशनल हायवे क्र.६ सौंदड फुटाळा येथील मार्गाच्या कडेला ट्रक उभा करून करुन रेल्वे हाईट पोल मोजण्यासाठी गेला. त्या वेळी नॅशनल हायवेच्या कडेला ३० ते ३५ ट्रक उभे होते. मात्र ते सर्व ट्रक सोडून गुरूभेजसिंह यांच्या ट्रकमध्ये दोन आरटीओ पोलीस अधिकारी शिरले. त्यांनी छाणनीच्या नावावर ट्रकचे दार उघडून गाडीतील कागदपत्रे व बाजूला शिट खाली ठेवलेले ३० हजार रुपये लंपास केले. यानंतर बाजूच्या वाहनधारकाला सांगितले की, या ट्रकच्या चालकाला सांगा की कागदपत्रे नेण्याकरिता गोंदिया आरटीओ आॅफिसमध्ये यावे, असे सांगितले. जेव्हा ट्रक चालक आपल्या वाहनाजवळ आले तेव्हा त्यांना बाजूच्या लोकांनी आरटीओ अधिकाऱ्यांचे बोलणे सांगितले. मात्र त्यांनी ट्रकचे दार उघडून पाहिल्यावर काही कागदपत्रे विखूरलेले होते. तसेच गाडीच्या कागदपत्रासह ३० हजार रुपये गायब झाल्याचे समजले. त्यांनी आजूबाजूला याबाबत चौकशी केली असता गोंदिया येथील आरटीओ पोलीस अधिकारी बोलेरो गाडीने आले व तुमच्या गाडीत शिरले, अशी माहिती घटनास्थळी असलेल्या लोकांनी दिली. ही बाब कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून त्यातून लक्षात येते की उभ्या वाहनामध्ये पोलिसांनीच किंवा पोलिसांच्या वेशभूषेत असलेल्या संधीसाधूंनी हातसाफ केले आहे.जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या पोलिसांवर असते तेच जर चोरी करत असतील तर सर्वसामान्यांनी दाद मागावी तरी कुठे?असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय आरटीओ पोलीस अधिकाऱ्यांच्या वेशभूषेत इतर कोणी संधीसाधू किंवा बनावटी पोलीस तर नव्हते, अशीही चर्चा होत आहे.सध्या मागील अनेक दिवसांपासून या भागात घरफोड्यांचे प्रकरण होत आहेत. ते आरोपी अजूनही मिळाले नसून हा नवीन प्रकार घडल्याने पोलीस विभागावर कोण मेहरबान आहे, असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होत आहे. आता पोलीस कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात येईल याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. सदर प्रकरणाच्या माहितीनुसार संबंधित प्रतिनिधीने माहिती मागितली असता स्थानिक आरटीओ पोलिसांनी माहिती न देता त्यांनी गोंदिया आरटीओ कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक दिला व माहिती घेण्यास सांगितले. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यावर वर्दीवर लावलेले बक्कल नंबर व नाव दोन्ही अधिकाऱ्यांचे नव्हते, असे सांगण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाचे गुढ कायम आहे.