शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

हुंडा मुलांना घ्यायचा असतो की मुलांच्या आई-वडिलांना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:31 IST

.................................. जिल्ह्यात हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी २०१९- ३७ २०२०-१२ २०२१- १८ ................... हुंडाविरोधी कायदा काय? लग्नासाठी मुलाने मुलीच्या वडिलांकडून पैसे, ...

..................................

जिल्ह्यात हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी

२०१९- ३७

२०२०-१२

२०२१- १८

...................

हुंडाविरोधी कायदा काय?

लग्नासाठी मुलाने मुलीच्या वडिलांकडून पैसे, दागिने, बंगला किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू तसेच लग्नात होणारा नवरदेवाचा खर्च मुलीच्या वडिलांनी सांभाळावा यासाठी मुलाकडील मंडळींनी अपेक्षा ठेवून केलेली मागणी म्हणजे हुंडा होय. या हुंडा मागणाऱ्यांना लोकांना ३ वर्षांचा कारावास होऊ शकतो.

...........

मुलांच्या मनात काय?

मुलांना मुलगी सुंदर, सुशील आणि संस्कारवान हवी असते. तिच्या पैशाकडे मुलांची नजर नसते. परंतु मुलाच्या नातेवाइकांनी मुलीच्या वडिलांना हे माग, ते माग असे म्हणून मुलावर दबाव टाकला तर मुलगाही त्याची मागणी करतो.

- प्रेमानंद पाथोडे, पदमपूर

मुलाला आपली जीवनसाथी योग्य मिळावी, ती रूपवान, संस्कारवान आणि आपल्यावर शंभर टक्के प्रेम करणारी असावी असेच वाटते. तिच्याकडून कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. आई-वडिलांकडून हुंड्यासाठी दबाव पडला तर ते हुंडा मागतात.

- हिमालय राऊत पोवारीटोला

.......................

मुलांच्या पालकांना काय वाटते

१)आपला मुलगा शिकून खूप मोठा झाला. नोकरीवर लागला. मुलाच्या वडिलांनी जमीन विकून त्याला शिकवले आणि अधिकारी केले तर त्याच्यावर आम्ही केलेल्या मेहनतीवर मुलगी मजा मारेल म्हणून काही लोक मुलीच्या वडिलांकडून हुंडा घेतात, पण ते चुकीचे आहे.

- योगेश खोटेले, डोंगरगाव

२) आपला मुलगा किती होतकरू आहे, हे न पाहता गोरगरिबांपासून, गर्भश्रीमंतांपर्यंत आणि अशिक्षितांपासून अगदी उच्चशिक्षितांपर्यंत हुंडा मागितला जातो. लग्नात होणारे अवडंबर, मुलाला लग्नात लागणारा खर्चही मुलींच्याच वडिलांकडून घेतला जातो, हे चुकीचे आहे.

- माया शिवणकर, आमगाव

.....................

मुलींच्या मनात काय?

१) नवरा मुलगा निर्व्यसनी, कर्तबगार आणि सन्मानाची वागणूक देणारा असावा. लग्नाच्या गाठी ठरविताना किंवा लग्न ठरल्यावर मुलीच्या वडिलांना ब्लॅकमेल करून हुंड्याच्या रूपात आपल्या मुलाला विक्री करण्याचा मानस ठेवतात हे योग्य नाही.

- सुप्रिया वाहने,

......

२) मुलाच्या कुटुंबीयांना मुलगा कर्तबगार वाटतो तर मुलीच्याही आई-वडिलांना मुलीचा अभिमान वाटतो. मुलामुलींचे लग्न जोडतानाच हुंडा घ्यायचा किंवा नाही हे ठरविल्यानंतरच लग्न जोडावे. अन्यथा विनाकारण मुलींनाच नाव ठेवणारा समाज आहे.

- ज्योती कोरे,

..................

मुलींच्या पालकांना काय वाटते?

१) मुलगा नोकरीवर आहे, आपली मुलगी सुखात राहील म्हणून मुलीचे पालक आपण त्रास सहन करून मुलाला हुंडा देतात. परंतु हुंडा घेणारा मुलगा आपल्या मुलीला कधीच सुखात ठेवणार नाही, त्याची हुंड्याची हाव वाढतच जाईल हे निश्चित.

- यादनलाल लिल्हारे, पालक

.....

२) हुंडा म्हणून सरळ पैसे न घेता गाडी, बंगला, फ्लॅट, प्लाॅट, मौल्यवान दागिने मागितले जातात. लग्नात होणारे अवडंबर, मुलाला लग्नात लागणारा खर्चही मुलींच्याच वडिलांकडून घेतला जातो. लग्नात कन्यादानात झालेल्या मुलीच्या पैशांवरही सासरच्या मंडळींची नजर असते. हुंडा मागणारे असमाधानी असतात.

- गजानन शेंडे, पालक