शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण पीक नष्ट झाल्यावर सवलतीचे औषध देणार का?

By admin | Updated: September 1, 2016 00:43 IST

यावर्षी चांगल्या पावसाच्या अंदाजाने हरखून गेलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने पुन्हा दगा दिला आहे.

शेतकऱ्यांचा सवाल : रोगपीडित धानावर फवारणीसाठी सवलतीचे कीटकनाशक नाहीगोंदिया : यावर्षी चांगल्या पावसाच्या अंदाजाने हरखून गेलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने पुन्हा दगा दिला आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे धानपिकावर कीडीचा प्रादुर्भाव झाला. त्यासाठी सवलतीच्या दरात कीटकनाशक उपलब्ध करून दिले जाणार आहे. मात्र त्याबाबतची मागणी करूनही कीटकनाशकाचा पुरवठा अद्याप झालेला नाही. त्यामुळे कीडींनी संपूर्ण पिक नष्ट केल्यावर कीटकनाशक देणार का? असा प्रश्न तमाम शेतकऱ्यांना पडला आहे.यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अनेकांना दुबार पेरणी करण्याची पाळी आली. पावसाच्या अभावाने काही ठिकाणी आवत्या टाकण्यात आल्या. नैसर्गिक संकटात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या संकटात आता पुन्हा निसर्गाने भर टाकली. सध्या भापपिकांवर खोडकिडा व लष्कळी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने हवे तेवढे उत्पन्न मिळणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी गोंदिया व सडक-अर्जुनी या दोन तालुक्यांत भातपिकांवर खोडकिडा (वायएसबी) व लष्करी अळी) यांचा प्रादुर्भाव आढळला आहे. मागील आठ दिवसांपूर्वी गोंदिया तालुक्याच्या आसोली व परिसरात खोडकिड्याचा प्रादुर्भाव आढळला होता. मात्र कृषी विभागाच्या सल्ल्याने व औषधाने सध्या नियंत्रणात असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत सडक-अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार, ब्राह्मणी, रेंगेपार, खोबा व जवळील परिसरात खोडकिडा व लष्कळी अळींनी धानपिकांना ग्रासले आहे. मात्र ते आर्थिक नुकसान पातळीच्या आत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे म्हणणे आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होणार, यात शंका नाही. याशिवाय इतरही क्षेत्रात धानपिकांना रोगांनी ग्रासले आहे. क्लोरोपायरीपास्ट ही औषध गादमाशी, खोडकिडा व पिकांशी संबंधित सर्वच रोगांवर प्रभावी असून आठ हजार लिटर प्रात्यक्षिकांमागे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या औषधाचे दर २६३ रूपये असून यातील १९२ रूपये कृषी विभाग देईल तर ७१ रूपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. मात्र ही औषधसुद्धा अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)