शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांच्या दहशतीत विद्यार्थी करतात ज्ञानार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:20 IST

आथली येथील जिल्हा परीषद शाळेतील प्रांगणात असलेल्या वडाच्या झाडावर मागील काही दिवसांपासून मधमाशाचे पोळे आहेत.

ठळक मुद्देआथली जि.प. शाळेतील प्रकार : महिनाभरात तीसहून अधिक विद्यार्थी जखमी

ऑनलाईन लोकमतलाखांदूर : आथली येथील जिल्हा परीषद शाळेतील प्रांगणात असलेल्या वडाच्या झाडावर मागील काही दिवसांपासून मधमाशाचे पोळे आहेत. या मधमाशांच्या हल्ल्यात आतापर्यंत तीसहून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना दारे, खिडक्या लावून मधमाशांच्या दहशतीत शिक्षण घ्यावे लागत आहे.यासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामशिक्षण समितीच्या सदस्यांनी प्रशासनाकडे धाव घेतली. मात्र कुणीही दखल घ्यायला तयार नाही. त्यामुळे प्रशासनाने दखल न घेतल्यास २१ फेब्रुवारीला शाळेला कुलूप ठोकण्याचा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे.लाखांदूर तालुक्यातील आथली हे १,५०० लोकवस्तीचे गाव आहे. येथे जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी केंद्र व ग्रामपंचायत भवन हे एकाच प्रांगणात आहेत. या इमारतीच्या मध्यभागी वडाचे जुने झाड आहे. या झाडावर शंभराहून अधिक आग्या व येन्दया अशा दोन प्रकारचे मधमाशांचे पोळे आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत १ ते ७ वर्ग असून त्यात ११२ विद्यार्थी व ६ शिक्षक, अंगणवाडी केंद्रात ६० विद्यार्थी आहेत.या वडाच्या झाडाखाली बोरवेल आहे. त्या ठिकाणी शालेय विद्यार्थी पाणी पितात. दुपारच्या वेळी शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम सुरू असताना स्वयंपाकाच्या धुरामुळे मधमाशा उडून वर्गखोलीत जातात. तिथे असलेल्या लोकांवरही त्या हल्ला करतात.मागील महिनाभरापासून मधमाशांनी कहर केला आहे. आतापर्यंत मधमाशांच्या हल्ल्यात आचल सुखदेवे, समीक्षा सुखदेवे, वृंदा बागडे, कला शहारे, दिव्या सुखदेवे, सानिया रामटेके, सुमित नागोसे, मोनिका शहारे, आर्यन नागोसे, तन्मय ठाकरे, सुजल ठाकरे, तर शिक्षक चकोले, राऊत, मुख्याध्यापक शेंडे, शिक्षिका मुंडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दिलीप सुखदेवे, सुरेश ठाकरे अशा अनेकांना मधमाशांनी चावा घेतला आहे.त्यामुळे यासंदर्भात खंडविकास अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, वनक्षेत्राधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत, शिक्षण समितीने निवेदन दिले. मात्र कुणीही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन मधमाशांचे पोळे हटविण्याची उपाययोजना करण्याची मागणी सरपंच ठाकरे, उपसरपंच खेमराज मेश्राम, शेखर ठाकरे, तिलकदास बागडे, दिलीप सुखदेवे व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह या शाळेमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.