शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे फोटो असलेले डाक तिकिटे बंद करू नका

By admin | Updated: September 20, 2015 02:20 IST

टपाल तिकीटावरुन इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेली तिकीटे बंद करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे.

आंदोलनाचा इशारा : शिक्षण सभापती कटरे आक्रमकगोंदिया : टपाल तिकीटावरुन इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेली तिकीटे बंद करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत बालीशपणाचा असून त्याबद्दल मोदी सरकारचा निषेध करीत असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी म्हटले आहे. संपुआच्या कारकीर्दित आधुनिक भारताचे शिल्पकार या नावाने काढलेल्या टपाल तिकीटाच्या मालीकेत इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, होमी जहांगीर भाभा, जेआरडी टाटा आणि मदर टेरेसा यांचा समावेश होता. सन २००९ साली यामध्ये ए.व्ही. शामास्वामी, सी.व्ही. रमन आणि रुक्मीनी देवी अंरुदले यांचा समावेश करण्यात आला.एखादे नवीन सरकार देशात सत्तेवर आले तर त्या सरकारला वाटत असेल तर त्यांनी टपाल तिकीटांची नवीन मालीका सुरू करावी. तो त्या निर्वाचित सरकारचा तो अधिकर आहे. आम्हाला त्याचा विरोध नाही. परंतु ज्या महान विभुतींनी हा देश घडविण्यासाठी मोलाचे कार्य केले देशासाठी प्राणाची आहुती दिली त्यांना टपाल तिकीटाच्या मालीकेतून हद्दपार करणे कितपत योग्य आहे. याचा विचार देशातील सरकारने करणे क्रमप्राप्त आहे. परंतु देशातील मोदी सरकारने माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेल्या टपाल तिकीटांना बंद करणे म्हणजे गांधी कुटुंबियांच्या प्रति असलेला मोदी सरकारचा नकारात्मक दृष्टीकोण व द्वेश भावना देशातील जनतेला समजल्या शिवाय राहणार नाही. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. देशातील जनता भोळी राहिलेली नाही.इंदिरा गांधी व राजीव गांधी या साध्या व्यक्ती नव्हत्या. तर त्यांनी देशाचे पंतप्रधान पद भूषविले आहे. इंदिरा गांधीनी पाकिस्तानच्या विरोधात लढा देत पाकिस्तानला त्याची जागा दाखवून बांग्ला देशाची निर्मिती केली. राजीव गांधी यांनी देशात तंत्रज्ञानाची क्रांती घडवून देशाला प्रगती पथावर नेणारा दीपस्तंभ होते. हे कोणीही नाकारु शकत नाही. त्यामुळे त्यांची प्रतिमा असलेली टपाल तिकीटे हद्दपार करणे म्हणजेच देशातील सरकारची सुडभावनेची प्रवृत्ती स्पष्ट होते. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांची प्रतिमा असलेली टपाल तिकीटे बंद केल्यास काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल आम्ही त्यासाठी वचनबद्ध आहोत, असा इशारा जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)