शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नाही लागणार पाणीपट्टी कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 20:38 IST

नगर परिषदेच्या हातपंप व पंपहाऊसचे पाणी वापरणाऱ्या कुटुंबीयांना विशेष-सामान्य पाणीपट्टी कर लावण्याचा नगर परिषद प्रशासनाचा प्रस्ताव सर्वानुमते नामंजूर करण्यात आला. नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत शुक्रवारी (दि.२८) तसा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता पाणी वापरणाऱ्यांना पाणीपट्टी कर लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभेत प्रस्ताव नामंजूर : शहरातील उद्यानांचा विकास होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेच्या हातपंप व पंपहाऊसचे पाणी वापरणाऱ्या कुटुंबीयांना विशेष-सामान्य पाणीपट्टी कर लावण्याचा नगर परिषद प्रशासनाचा प्रस्ताव सर्वानुमते नामंजूर करण्यात आला. नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत शुक्रवारी (दि.२८) तसा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता पाणी वापरणाऱ्यांना पाणीपट्टी कर लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.नगर परिषदेच्यावतीने गुरूवारी (दि.२७) सर्व साधारण सभा बोलाविण्यात आली होती. मात्र सभेत विषयसूचीतील विषयांना सोडून अन्य विषयांवर चर्चा झाल्याने सभा तहकूब करून शुक्रवारी (दि.२८) बोलाविण्यात आली होती. या सभेत विषयसूचीतील विषयांवर चर्चा करण्यात आली व पाणीपट्टी कर लावण्याचा विषय मांडण्यात आला. मात्र सभेला उपस्थित सदस्यांनी श्रीमंत व्यक्ती नगर परिषदेच्या नळ व पंपहाऊसवर जाऊन पाणी घेत नसून गरीबच त्याला लाभ घेत असल्याचे मत सभेत मांडले. ही बाब लक्षात घेत पाणीपट्टी कर लावण्याचा विषय नामंजूर करण्यात आला.याशिवाय, शहरात ठिकठिकाणी वॉचरकुलर लावणे, सर्वसाधारण नागरिकांना तीन हजार नळ कनेक्शन उपलब्ध करून देणे, पंपहाऊसमध्ये सोलर पंप बसविणे यासह अन्य विषयांना मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला होत असलेली अडचण बघता मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सुरू करण्याचे ठरले व विषयाला मंजुरी देण्यात आली. शिवाय, मोहिमेंतर्गत पकडण्यात आलेली जनावरे तात्पुरत्या तत्वावर नगर परिषद कार्यालयाच्या बाजूला जुन्या अग्निशमन विभागाच्या जागेत ठेवण्याचे ठरले.तसेच नगर परिषद क्षेत्रात उद्यानांसाठी राखीव जागांचा अमृत योजनेतून विकास करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. नगर परिषद क्षेत्रात सुभाष उद्यान हे सर्वात जुने उद्यान असून त्यानंतर नगर परिषदेने निर्माण केलेले काही उद्यानच आहेत. अशात शहरात जास्तीतजास्त उद्यानांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. यातूनच आता अमृत योजनेतून राखीव जागांचा विकास केला जाणार आहे.भुयारी गटार योजनेचे कंत्राट रद्दया सभेत शहरातील भुयारी गटार योजनेचा विषय सर्वात महत्वाचा होता. २७ आॅगस्ट २०१८ रोजी विशेष सभा घेवून भुयारी गटार योजनेचा मंजुरी देण्यात आली होती. मात्र आता सहा महिन्यांपेक्षा जास्तीचा कालावधी लोटूनही कंत्राटदाराने योजनेचे काम सुरू केले नाही. त्यामुळे सर्वच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. परिणामी कंत्राटदाराला देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.मनुष्यबळ पुरवठ्यासाठी एक वर्षाचे कंत्राटनगर परिषदेत मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी एका एजंसीला कंत्राट देण्यात आले होते. विशेष म्हणजे, या एजंसीवर जास्त मेहरबानी दाखवून तीन वर्षांचे कंत्राट देण्यात आले होते. सभेत मनुष्यबळ पुरवठ्याचा विषय मांडण्यात आला. यावर या एजंसीचे तीन वर्षांचे कंत्राट रद्द करून नवीन निविदा मंजूर होत पर्यंत त्यांचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच यापुढे मनुष्यबळ पुरवठासाठी एक वर्षांचे कंत्राट दिले जाणार असून निविदा आमंत्रीत करण्याचे ठरले.